दिल्ली येथे 7 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन

दिल्ली येथे 7 ऑगस्टला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव

नागपूर: दि 7 ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन तालकटोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात अधिवेशनाची तयारी सुरु आहे.

ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, कलम 243(T) व 243(D) सेक्शन 6 मध्ये बदल करून ओबीसींना 27% आरक्षण साठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृहासाठी, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळण्यासाठी ओबीसी शेतकऱ्यांना 100% सबसिडी वर योजना लाग़ू करण्यात याव्या. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यासाठी, क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासाठी व राज्याच्या व केंद्राच्या इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या बाबींवर अधिवेशनात मंथन होणार आहे.

या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, छत्तीगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलीन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भगवान कराड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव,माजी मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष जस्टीस ईश्वरया, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जयदत्त सिरसागर, खासदार गणेश सिंग, खासदार वड्डीराजू रवींद्र, खासदार बड्डुला यादव, खासदार राम मोहन नायडू, खासदार राम चंद्रा जागरा, खासदार बाळूभाऊ धानोरकर, खासदार रामदार तडस, खासदार सुशील मोदी, खासदार विलसन, माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहीर, खासदार डॉ. के. लक्ष्मण, खासदार भारत मार्गणी, खासदार मिसा भारती,माजी खाजदार राजकुमार सैनी, आमदार किसन कातोरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार ,आमदार भाई जयंत पाटील,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार रामकुमारी ढिल्लोन, माजी मंत्रीआमदार परिणय फुके, माजी मंत्री संजय कुंटे यांच्यासह इतरही मान्यवरांना निमंत्रित केले आहे.

अधिवेशनात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला देशभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सहसचिव शरद वानखेडे, महामंत्री मुकेश नंदन, प्रा. शेषराव येलेकर, युवा महासंघाचे अध्यक्ष सुभाष घाटे, डॉ. सुधाकर जाधवर,इंजी. रमेशचंद्र घोलप,गुणेश्वर आरिकर, मनोज चव्हाण,रेखा बारहाते, सुषमा भड, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरध, युवाचे प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, कर्मचारी महासंघाचे श्याम लेडे,महिला महासंघाच्या कल्पना मानकर, कर्मचारी महिला महासंघाचे रजनी मोरे,दिनेश चोखारे, राजु चौधरी, शकिल पटेल, प्रदिप वादाफळे, राजेश काकडे, विजय पटले,विजय पिदूरकर, पराग वानखेडे, रोशन कुंभलकर , तुळशीदास भुरसे, विनोद उलीपवार शुभम वाघमारे,निलेश कोडे, रुषभ राऊत,रुतिका डफ यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles