हिंगण्यात ओला दुष्काळ जाहीर करा – मनसेची मागणी
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- आज दिनांक २७ जुलै २०२२ ला मा. प्रियदर्शनी बोरकर तहसीलदार हिंगणा तालुका यांना ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा करावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. २०१९ ते २०२२ ला अतिवृष्टी झाली. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार होते. पण त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्याला कोणतीही मदत दिली नाही. शेतकरी राजा कर्ज काढून पेरणी करतो. निसर्गाच्या लहरी पणा मुळे शेतकरी डबघाईस आला. दोन वर्ष कोरोना काळात शेतकरी पूर्ण हतबल झाला. शेतकरी आत्महत्याला प्रवृत्त न होता हिंगणा तालुक्याला ओला दुष्काळ घोषित करून थेट शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा करा असे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी हिंगणा तालुका अध्यक्ष दीपक नासरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन चिटकूले, हिंगणा विधानसभा सभा संघटक गुड्डू पारधी, विधानसभा सचिव नंदू पोटे, तालुका सचिव वैभव मुळे, तालुका संघटक शुभम भोकरे, वाहतूक सेना संघटक निलेश भुरसे, वाहतूक सेना चिटणीस महेश शाहू, तालुका उपाध्यक्ष बाबा महाजन, राजेश कावळे, नितेश लांजेवार,नरेश शेंडे, आखरे आणि महिला सेनेच्या अफसानाताई पठाण,सरिताताई महाजन,लताताई जाधव, सीमाताई हजारें,अश्विनीताई सोनुरकर, संगीताताई कोरडे आदि कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.