
स्वामी विवेकानंद युथ तर्फे गजानन ढाकुलकर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट
हिंगणा प्रतिनिधी
हिंगणा :- स्वामी विवेकानंद युथ मल्टीपर्पज सोसायटी हिंगणा तर्फे जेष्ठ पत्रकार गजानन ढाकुलकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . गजानन ढाकुलकर हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अन्यायाविरुद्ध समाजामध्ये नागरिकांच्या जनसामान्यांच्या हितासाठी लढा देण्याचे उत्कृष्ट कार्य यांच्या मार्फत करण्यात येते. तसेच गजाननराव हे आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून आपल्या लेखणीच्या ताकतीचा वापर जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याकरिता करत असतात.
ते नेहमी दिन दुबळ्या व असहाय्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी नेहमीच प्रशासना सोबत लढत असतात. तसेच मित्रांमध्ये अतिशय मनमिळाऊ प्रेमळ व निमित्त सर्वांच्या मदतीला धावणारे असे मनमिळावू स्वभावाचे तसेच उत्कृष्ट मराठी कलावंत म्हणून ज्यांची तालुक्यात ओळख आहे.
गजानन ढाकुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठे मन असणाऱ्या या महान व्यक्तिमत्व असलेल्या गजाननराव यांना स्वामी विवेकानंद युथ मल्टीपर्पज सोसायटी हिंगणा व मित्र परिवारा तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो भेट करून तसेच पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कमलेश खोब्रागडे, अविनाश फुलबेल, ओमप्रकाश वैद्य, विनायकराव इंगळे गुरुजी तसेच समस्त मित्रपरिवार व संस्थेचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डॉ.अतुल लांबसोंगे , अशोक रहांगडाले , अतुल वानखेडे ,प्रमोद गाडगे , देवीदासजी काटोले गुरुजी आदी उपस्थित होते.