नागपुरात ईडी कार्यालयावर कॉंग्रेसचा हल्लाबोल

नागपुरात ईडी कार्यालयावर कॉंग्रेसचा हल्लाबोल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव

नागपूर: जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी व नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष, मा.आ.श्री. नाना पटोले यांच्या आदेशानुसार केंद्रातील भाजपा सरकार महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी विरोधी धोरण अश्या बाबतीत आवाज उठविणाऱ्या पक्षाला मोदी सरकार मोठ्या प्रमाणात दडपशाही करीत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. खासदार श्रीमती सोनिया गांधी ह्यांना ईडी ची नोटीस पाठविली व त्यांना 27 जूलै 2022 रोजी सक्तवसुली संचालनालयाची (ई.डी) कार्यालय, दिल्ली येथे चौकशी करिता बोलविण्यात आले आहे.

ह्याचा प्रतिकार करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाची (ई.डी) कार्यालय, CGO complex , टी वी टॉवर , सेमिनरी हिल्स, नागपूर येथे सकाळी 11.30 वाजता मा.आ.श्री सुनील केदार(माजी मंत्री), मा.श्री. राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी), मा.आ.श्री. विकास ठाकरे (अध्यक्ष नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी), प्रामुख्याने उपस्थित होती.

या वेळी सौ. रश्मी बर्वे (अध्यक्ष नागपूर जिल्हा परिषद), एस. क्यू झमा (माजी आमदार), श्री.सुरेश भोयर,श्री. प्रसन्ना तिडके(सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), सौ. सुमित्रा कुंभारे (उपाध्यक्ष जिहा परिषद नागपूर), श्री. तपेश्वर वैद्य(जिल्हा परिषद सभापती कृषी), सौ. भारती पाटील(जिल्हा परिषद सभापती शिक्षण विभाग), सौ. नेमावली माटे(सभापती समाज कल्याण),आजी/माजी खासदार व आमदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, प्रदेश काँग्रेस कमिटी पदाधिकारी, ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, नगर परिषद, नगर पंचायतीचे पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष, महीला काँग्रेस,युवा काँग्रेस, सेवादल, इंटक, अनुसूचित जाती/जमाती सेल, इतर मागास्वर्गीय विभाग, NSUI, अल्पसंख्यक सेल चे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने भाजपा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याकरीता, श्रीमती सोनियाजी गांधी ह्यांना बळ देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles