वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी शिबीर लावा-यशवंत कातरे

वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी शिबीर लावा-यशवंत कातरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक (माध्यमिक) आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शिबीर लावावे, असे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे देण्यात आले.
सोबतच नागपूर शिक्षण उपसंचालक आणि नागपूर शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक यांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढण्याबाबत शिबिर लावावे म्हणून निवेदन देताना सविस्तर चर्चा करण्यात आली, झालेल्या चर्चेनुसार लवकरच तीन ऑगस्टला या संदर्भात शिबिर नागपूर मध्ये लावणे जाणार आहे. तसेच प्रस्तावास लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी देखील लवकरच प्रसिद्धीस केली जाणार आहे, अशी माहिती मिळाली.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री यशवंत कातरे यांनी भ्रष्टाचार होऊ नये आणि शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लवकरात लवकर लागू व्हावी, यासाठी शिबिर घेऊन सर्व प्रस्ताव निकाली काढण्याची मागणी केलेली आहे आहे.

निवेदन देताना श्री.यशवंत कातरे, श्री. केशवानंद बमनोटे, श्री. तेजराम बांगडकर व श्री. विशाल बोरकर हे उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles