Home नवी दिल्ली “जो ओबीसी की बात करेगा ,वही देशपे राज करेगा” – डाॕ. बबनराव...

“जो ओबीसी की बात करेगा ,वही देशपे राज करेगा” – डाॕ. बबनराव तायवाडे

149

“जो ओबीसी की बात करेगा ,वही देशपे राज करेगा” – डाॕ. बबनराव तायवाडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगळे यांची ओबीसी संघाला १० हजार रुपये देणगी_

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

हिंगणा- आज घडीला प्रत्येक माणुस स्वतःसाठी जगत आहे.परंतु जे समाज कल्याणासाठी जगतात त्यांना जीवनात वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक पक्षांनी ओबीसींच्या भरवशावर सत्ता भोगली आहे.व भोगत आहे.पण ओबीसींच्या हितासाठी काहीच कार्य केले नाही.आता ओबीसी समाज हा जागृत होऊन एकत्र येत आहे.आणि म्हणुन यापुढे “जो ओबीसीकी बात करेगा ,वही देशपे राज करेगा” असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रिय अध्यक्ष डाॕ.बबनराव तायवाडे यांनी दिला.

हिंगणा औद्योगिक परिसरातील पारधीनगर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजुभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा संपर्क कार्यालयाचे डाॕ.बबनराव तायवाडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी राष्ट्रिय युवा अध्यक्ष सुभाष घाटे,ओबीसी महासंघाच्या जिल्हा प्रभारी तथा नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ.उज्वलाताई बापूसाहेब बोढारे ,प्रसिद्ध उद्योजक प्रभाकरराव देशमुख ,जिल्हाध्यक्ष राजु चौधरी,जि.प. सदस्या रश्मीताई कोटगुले , कुंदाताई राऊत, हिंगणा प.स सभापती रुपाली खाडे, विदर्भ उपाध्यक्ष प्रा.सुरेंद्र मोरे,बाळासाहेब वाघमारे,कार्याध्यक्ष रवीभाऊ देशमुख ,जिल्हा महिला अध्यक्षा निशाताई खडसे,महासचिव प्रिती राऊत,युवा अध्यक्ष शरद वाटकर ,जिल्हा सचिव तथा माजी सरपंच रविंंद्र आदमने , संघटक दिलीप राऊत,युवा महासचिव तथा राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष आशिष पुंड,डिगडोह ग्रामपंचायत सरपंचा इंद्रायनीताई काळबांडे ,पंचायत-समिती सदस्य लिलाधर पटले,उमेशसिंह राजपुत,दक्षिण-पच्छिमचे अध्यक्ष ललितराव देशमुख , अतुलराव देशमुख , बापूभाऊ बोढारे , प्रविणभाऊ खाडे , ज्येष्ठ पत्रकार लिलाधर दाभे, सुशील मिश्रा हिंगणा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर राऊत ,महिला अध्यक्षा सायली थोटे व युवा अध्यक्ष उमेश राऊत , शशिकांत थोटे , विठ्ठलभाऊ नगराळे , हुसेन बागसवार आदि उपस्थित होते.

ओबीसी बांधवांनी आता थेट जेसिबी प्रमाणे आपले वर्तन आणि आपले विचार मांडले पाहीजे.जेसिबी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर .याच महापुरुषांच्या विचारांचा धागा ओबीसींच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे रोखठोक विचार जी.प.सभापती उज्वलाताई बोढारे यांनी मांडले .माजी प.स.सदस्य सुरेशभाऊ काळबांडे यांनी राजु चौधरी यांच्या कार्याचा आढावा सादर केला. या वेळेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ पत्रकार विनायक इंगळे गुरुजी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे यांना संघाच्या कार्यासाठी १० हजार रुपयाचा धनादेश दिला.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकारी यांनी इंगळे गुरुजींचे आभार मानले. संचालन महिला महासचिव प्रिती राऊत यांनी तर आभार राजुभाऊ चौधरी यांनी मानले.