
नागपुरात राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने भाजप नेत्यांना जातनिहाय जनगणना करण्याकरीता निवेदन
नागपूर: राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक आमदार महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येत्या शुक्रवारी दिनांक ५ ऑगस्ट 2022 रोजी, दिल्ली येथे जंतरमंतर मैदानावर जातिनिहाय जनगणनेच्या मागणीकरीता एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. या मागणीसाठी रासप मैदानावर लढत असताना या प्रश्नावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, यासाठी केंद्रीय मंत्री मा.ना.नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभा क्षेत्राचे खा.कृपाल तुमाने यांनी या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊन जातिनिहाय जनगणनेची मागणी करावी.
ओबीसी आरक्षण कायम करावे. नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी. 50% सिलिंग हटवावे. न्याय संस्था केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्था मध्ये संपूर्ण आरक्षण लागू करा. शेती धान्य मालाला हमी भावाने खरेदी करा. महागाई हटविण्यासाठी ठोस पावले उचला. संपूर्ण शिक्षण मोफत करा. मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करा आदी मागण्या मान्य करण्याकरीता राष्ट्रीय समाज पक्षाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा. याकरीता नागपूरात आज रविवारी 31 जुलै 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता. कृपाल तुमाने यांचे जनसंपर्क कार्यालयात आणि केंद्रीय मंत्री मा. ना.नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालयात दुपारी 3:00 वाजता. राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रा. रमेश पिसे आणि नागपूर शहर अध्यक्ष डॉ.अनंत नास्नूरकर यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ संपर्क प्रमुख कृषी सम्राट राजेंद्र पाटील, विदर्भ प्रदेश सचिव रामदास माहुरे, विदर्भ प्रदेश कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामडी, विधि आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्ष एड. वासुदेव वासे, विदर्भ प्रदेश संघटक हरीकिशन (दादा) हटवार, नागपूर शहर सरचिटणीस डॉ. प्रशांत शिंगाडे, नागपूर शहर सचिव देविदास आगरकर, नागपूर शहर उपाध्यक्ष डॉ. अरुण चुरड, पूर्व नागपूर शहर संघटक डॉ. दादाराव इंगळे, दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वघरे, नागपूर रासप नेते उत्तम चव्हाण, नागपूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मेश्राम, वाडी शहराध्यक्ष संजय मेश्राम, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.