झेड.पी.मध्ये पुन्हा तोच सदस्य नको

झेड.पी.मध्ये पुन्हा तोच सदस्य नको



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

नागपूर :- ग्रामीण भागाचा विकास करणारी संस्था म्हणून जिल्हा परिषद बनवली आहे.त्याची कार्यकारी संस्था पंचायत समिती बनवली आहे.जिल्हा परिषद फक्त निधीचा बटवारा करते,लचके तोडते.काम नाही, विकास नाही.पंचायत समीती काम करते. मक्त्यांचे वाटप जिल्हा परिषद करते.पंचायत समीती निगराणी ठेवते.
जळगाव जिल्हा परिषद ही कोणत्याही पक्षाची असो,आहे चोरांची शाळा बनली आहे.अगदी प्रत्येक सदस्य,अध्यक्ष,सीईओ, बीडीओ सुद्धा.ही माणसे आठ तास पैकी एक तास प्रशासकीय काम करतात.सात तास चोरांचा बचाव करतात.तरीही सरकार यांना गलगठ्ठ पगार देते,गाडी ,मोटर ,बंगला देते.कदाचित सरकार मधील मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री हे सुद्धा यांचेकडून हप्ते घेत असावेत.

जळगाव जिल्हा परिषद आता लोकांचे नेतृत्व करणाऱ्यांची संस्था राहिली नाही.ती अस्सल ठेकेदारांची संस्था आहे.यापैकी एकही सदस्य जनतेचे प्रश्न घेऊन सभागृहात गेला नाही.अनेक ग्रामस्थांनी आंदोलन केले, उपोषण केले पण ,झेडपी सदस्य येऊन भेटला,विषय समजून घेतला ,मधे गेला,रूबाबाने बोलला,ए पांडे,ए पाटील,ए दिवेकर,ए आशिया ,हा काय प्रकार आहे ? या माणसाचा अर्ज तू वाचला नाहीस का ? तुला कळला नाही का ? नोकरी का करतोस ?फुकट पगार घेतोस का ?असे खडसावून कोणीही बोलला नाही.सगळेच झेडपी अध्यक्ष तर असे आढळले कि,ते पोर्च मधूनच गाडीत बसतात,पोर्चमधेच उतरतात.एकीनेही येऊन फोपाट्तात बसलेलल्या, भुकेल्या,तोंड उतरलेल्या आंदोलनकारी ग्रामस्थाकडे भेट दिली नाही.आणि आता याच बाया माणसे गावोगाव, घरोघरी जाऊन हात जोडणार आहेत.सांगणार आहेत. लुटमार करण्यासाठी आम्हाला पुन्हा निवडून द्या.उरला सुरला सत्यानाश करण्यासाठी.आतापासूनच गावोगावी मंडप टाकले.बोकड घेतले.बोगणं घेतले.स्वयंपाकी बुक झाले.बार बुक झाले.कुपन छापले गेले.जोरात तयारी आहे,झेपी सदस्य बनण्याची.सदस्य म्हणजे, लोकशाहीने अधिकृत केलेला चोर बनण्याची.दाऊद,राजन , गवळी यांनी आपल्या व्यवसायाचे पंजीकरण केले नाही.म्हणून त्यांना आपण चोर म्हणतो.ते असंघटित चोर होते.पण हे पंजीकृत, लोकशाहीमान्य चोर आहेत, निवडणूक आयोग कडे पंजीकरण केलेले चोर आहेत.यांना चोरी करण्याचा अधिकार राज्य घटनेने दिलेला आहे. म्हणून सन्मानिय चोर आहेत.हे राजमान्य चोर आहेत.आपण मतदार लोकमान्य बनवून देतो.या चोरांना निवडून देऊन चोरी करण्याचा परवाना आम्ही मतदार देणार आहोत.आतापर्यंत देत आलो आहोत.जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात भ्रष्टाचार झाला. सरपंच,ग्रामसेवक, बीडीओ,सीईओ यांच्या प्रशासकीय, तांत्रिक मान्यता घेऊनच.आणि त्याचा ठेका या झेडपी सदस्यांनी घेतला.आम्ही किमान दोनशे गावांच्या तक्रारी हाताळल्या.लोक तक्रार करतात.चौकसीची मागणी करतात.आंदोलनाची नोटीस देतात.तरीही एकही निर्दयी अधिकारी त्याची दखल घेत नाही.तक्रार केली आणि कागद बीडीओ,सीईओ च्या टेबलावर आला कि,त्याला चौकशी ची गरजच नसते.विषय हाताखालील असतो.पाहाता क्षणी समजतो.तरीही ही नोकर माणसे साधी चौकशी सुद्धा करीत नाहीत.चौदा दिवसात तर अशी तक्रार मुर्खालाही कळू शकते.पण एमपीएससी, युपीएससी उत्तिर्ण झालेल्या बीडीओ,सीईओ ला का कळत नसेल ? कळते.पण यांनीच या भ्रष्टाचाराचे नियोजन केलेले असते.थोडासा घाम फुटतो.पण हे दुर्लक्ष करतात.बोंबलतो.बोंबलू द्या.उपोषण करतो,मरू द्या.ते मुद्दे शोधतात,याला कायद्याच्या कचाट्यात कसे अडकवता येईल?आणि यासाठी आम्हीच निवडून दिलेले झेडपी सदस्य लूज होल शोधून देतात.कारण नोकर आणि झेडप्या यांनी संगनमताने अपहार केलेला असतो.चोर चोर मौसेरे भाई.एक सरकारचा ,दुसरा लोकांचा.पाचोरा आखतवाडेचे मुरलीधर परदेशी,पारोळा पिंपरी चे गुलाब पाटील,मुंदाणेचे चंद्रकांत सोनवणे, पाचोरा चे निलकंठ पाटील अशी अनेक उदाहरणे देता येतील.ज्यांनी या शासकीय, राजकीय चोरांच्या विरोधात तक्रारी केल्या त्यांचेवरच गुन्हे दाखल झालेत.म्हणजे चोर तो चोर,उपरसे शिरजोर?

मागील पंधरा वर्षाच्या काळातील झेडपी सदस्यांचा अनुभव घेतला असता,एकही जनतेशी प्रामाणिक आढळला नाही.पैकी आधिकतम तर ठेकेदार आहेत.कोणी बांधकाम,कोणी खडी क्रेशर,कोणी रेतीचा बायको, मुलगा,साला,सालदार, ड्राइव्हर,चमचा असा कोणाच्याही नावाने ठेका घेतात.काही अर्धवट बांधकाम करतात.काही तर फक्त कागदावरच करतात.संध्याकाळी सात नंतर झेडपीत येऊन चेक घेऊन जातात.या चोरांची खरी शाळा रात्री सात ते दहा पर्यंत चालते.तेंव्हाच यांच्या बोलेरो,टोयाटो,क्वीड येऊन गर्दी करतात.कारण तेंव्हा कोणी ग्रामस्थ नसतात.अण्टीकरप्शन नसते.सीईओ,डे सीईओ,बीडीओ नसतात.असतो फक्त, भाऊसाहेब.जो पैसे घेतो आणि चेक वाटतो.ग्रामीण मतदारांनी,एकदा कि असा चोर निवडून दिला कि, पांच वर्षे तो झेडपीच्या कुरणात चरतो.त्याने कितीही चोरले,मारले, पळवले तरीही हाकलता येत नाही.त्याला चोरीचा परवाना दिला जातो.म्हणून आता मतदान करतांनाच विचार केला पाहिजे,हा चोर किती वेळा आंदोलन करणाऱ्यांना भेटला?याने बीडीओची बाजू घेतली कि तक्रारदाराची? शौचालय, विहीर,रस्ता,गटार, पाणीपुरवठा ची तक्रार याला कळली नसेल का? कळली.पण हा सरकारी चोरांचा सहकारी झाला होता.हा लुटमार मधे सामील होता.असा हा ” घरका भेदी ” पुन्हा निवडून द्यायचा का?

माझे स्पष्ट मत आहे कि, आतापर्यंत जो माणूस किंवा बाई आधी झेडपी सदस्य होती , पंचायत समिती सदस्य होती त्याला किंवा तिला पुन्हा निवडून देऊच नका.पांच वर्षांनी निवडणूक घेण्याची तरतूद त्यासाठीच तर आहे.लोकशाहीचे तत्व आहे कि, लोकांनी प्रामाणिक लोकांना निवडून दिले पाहिजे.पांच वर्षांपूर्वी चुकले तर आता दुरूस्ती करता आले पाहिजे. लोकांना चोर किंवा दरोडेखोर आवडत असतील तर किमान पांच वर्षांनी बदलला पाहिजे.तेंव्हा आधीचा चोर सांप्रत चोराला काही प्रमाणात कि असेना चोरीत अडथळा आणू शकतो.जसे भाजप ने कांग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल, सेनेच्या चोरांवर इडीची कारवाई केली.हे एकतर्फी वाटते.जर २०२४मधे कांग्रेस चे सरकार आले कि ते सुद्धा भाजप च्या चोरांना इडीच्या वडीने धुवून काढणार आहेतच.आपले काम आहे, किमान चोर बदलणे.म्हणून तर निवडणूक आहे.खाण्यापिण्यासाठी नाही.जर तुम्ही खाऊन पिऊन घेऊन मतदान केले तर तुम्ही चोरांचे साथीदार आहात.छत्रपतींचे, गांधीजींचे किंवा बाबासाहेबांचे वारस सांगून त्यांना बदनाम करू नका.तुमच्या पापात या महापुरुषांना सहभागी करू नका. गावकऱ्यांनो, तुम्हाला दारू प्याल्याने,मटण खाल्याने, पैसे घेतल्याने सज्जन माणूस दिसणार नाही,दाखवला तरी समजणार नाही,समजला तरी तुम्ही मान्य करणार नाहीत.तेंव्हा किमान झेडपीचा , पंचायत समीतीचा चोर तरी बदलला पाहिजे.फरक पडेल.नक्कीच फरक पडेल.कारण एक चोर दुसऱ्या चोराला लुटत असतो.तो तुमच्या मदतीला येऊ शकतो.

अपहार, भ्रष्टाचारी हा शब्दप्रयोग वस्तू किंवा कार्य साठी योग्य आहे.पण जेथे प्रत्यक्ष पैशांची चोरी आहे,तेथे ” चोर ” हाच शब्दप्रयोग योग्य आहे.म्हणून यापुढे नेत्यांना, अधिकाऱ्यांना अपचारी, भ्रष्टाचारी असे संबोधन न करता ” चोर “हिच उपाधी देऊन प्रसिद्ध करा.त्यांच्या फोटोवर , पुतळ्यावर माननिय, सन्माननीय, आदरणिय,पुजनिय चोर ,महाचोर असे लिहा.ती काळाची गरज आहे.भारतीय भाषांतील शब्दकोशात, ऑक्सफर्ड च्या डिक्शनरीत तसे बदल करण्याची गरज आहे.

सद्यातरी झेडपी सदस्य बदलण्यासाठी आम्ही मतदारांनी कंबर कसली पाहिजे.एकही सदस्य पुन्हा निवडून येऊ नये,ही खबरदारी घेतली पाहिजे.ती आपली जबाबदारी आहे.आपण आपली जबाबदारी निभावणे आवश्यक आहे.नंतर पांच वर्षे तुमचे कोणीही ऐकून घेणार नाही.ना आमदार,ना खासदार,ना मंत्री.ते आपल्या चोरी व्यवसायात व्यस्त असतील. असे मत शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles