वाडी शहरात ‘आप’ निवडणूक लढविणार; मोर्चेबांधणीला सुरूवात
गजानन ढाकुलकर
हिंगणा वाडी :- आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्ता स्थापन केली व दिल्ली मॉडल म्हणून संपूर्ण देशात ओळखल्या जात आहे.हजारो लोक आम पार्टीत जुडत आहे.अशातच वाडी येथील विनीत गजभीये हे आम आदमी पार्टीच्या पुण्याच्या मीटिंग मधे नुकतेच जाऊन आले.
त्यांनी मीडिया सोबत बोलत असताना वाडी येथील आंम आदमी पार्टी ही मोठ्या झपाट्याने सभासद होईल अशी आशा व्यक्त केली. दिल्ली सारखी सुविधा वाडीच्या जनतेला लाभ मिळण्यासाठी निवडणुकीत उतरणे जरुरी आहे. हार जित समोरचा भाग आहे असे ही त्यांनी म्हटल आहे. वाडीतील जनतेला अपील करणार आहे की आम आदमी पार्टीत लोकांनी सहभाग घ्यावा व गरिबांना जशा सुविधा दिल्लीत आहे तशा सुविधा वाडीत पाहिजे असेल तर जंनतेणीआम पार्टीला मतदान करावं असे सुध्दा मत व्यक्त केले.