📗बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचनाकार📗

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : बेबनाव🥀*
*🍂बुधवार : ०३/ ०८ /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*बेबनाव*

नात्यांतील सांकव आजला
कसा मोडकळीस आला…
बेबनाव वाढत जाऊन….
एक एक वासा वाहत गेला
कळत नव्हते धो धो पावसांत
ते ओहोळ होते की अश्रूधारा
गालावर बरसणारे ते जलप्रपात
समंजस असावी नाती…….
जपावी अत्तराच्या कुपीपरी…
थेंब थेंबही न सांडता………
सुगंध पसरावा वाऱ्यावरी…..
न व्हावा बेबनाव कधीही कुणात
देवा हेच मागणे तुझ्या चरणाशी…
न रूतावा काटा काळजात……
वात्सल्याच्या बरसाव्या राशी…..

*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*
 
आई असते कल्पतरू
आई लेकरांची छाया 
आईच लेकरू
असते आईची माया ॥१॥
 
नसतो कधी बेबनाव 
कुणी तिच्यात भांडण
लावू शकत नाही
नातं असत ते अखंड ॥२॥

निरागस बालपण देते
आयुष्याचं गणित 
भराभर सोडवते
कोडी असोत अगणित ॥३॥

मनात असते ममता
नसतो बेबनाव कधी
गरज असते समंजता
येत नाही कुणी त्यांच्या मधी ॥४॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*

बसली होती बाकावर
आजूबाजूला गर्दी दाट
मन होई कावर बावर
मी पहात होती वाट

काय करावे सुचेनासे
समाजात वावरताना
संवाद घडता घडता
होऊन द्यावा बेबनाव

एक एक बिनधास्त क्षण
अंतर्मनात रुजतात खोल
मूक कमलावर गोड स्मित
दर्शवतात आनंदाचे मोल

कटाक्षाने पाळावी नेहमी
विशिष्ट अशी जीवनशैली
नकळत भरत जाईल बघा
नित्य नव्या आनंदाची धैली

जास्त अपेक्षेचा नसे भार
नको दडपणाखाली शरीर
हिरमुसून संपवते हा बेबनाव
जरी झाला थोडासा उशीर

सारुनी दूर निराशेची छटा
द्यावी स्वतःलाच नवी संधी
पसरावी चौफेर स्वर्णलाली
होऊन सुखाचे पहाट कधी

*सौ. कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

*बेबनाव*

माणसांच्या दुनियेत माणुसकी लोप पावतेय
बेबनाव करणाऱ्यांची जिकडे तिकडे चलती होते

पोटात एक ओठात दुसरे शब्दांचा सारा खेळ
हातोहात दुसऱ्याला फसवण्यात बसवतात मेळ

अंतरात दुसऱ्याविषयी भरलेली असते मळमळ
बेबनाव करीत दाखवतात फुकटची कळकळ

गोड गोड बोलून खोड मोडण्याची असते कला इतरांना तोंडघशी पाडून स्वतःचा करतात बोलबाला

वर वर माणुसकीचं दाखवायचं अवडंबर दुसऱ्यांच्या नात्यात वितुष्ट आणण्यात यांचा पहिला नंबर

खोटी स्तुती करताना शब्दांची किमया करायची
बेबनाव असा करायचा की भाषा अलंकाराने सजवायची

असा हा बेबनाव येतो जेव्हा अंगलट
तोपर्यंत आयुष्याचा झालेला असतो कायापालट

*सौ अनिता व्यवहारे*
*ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*

कितीदा ठरवले नव्याने जगायचे|
आनंदात भिजूनी सुखसरीत भिजायचे||

हिरवळ होती पायी मऊमखमली|
अचानक तीक्ष्ण काट्यांनी वाट कशी रोखली!||

सुखस्वप्ने नयनात किती साठवली|
नशिबाने बेबनाव करूनी ती हिरावली||

किती संकटांची वादळे मी झेलली|
दरवेळी सौख्यफुले का मृगजळ ठरली||

घनगर्द काळोखात ही मी चालते आशेने|
भेटेल मजसी पुन्हा चांदणसाज नव्याने||

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
*सांगली जिल्हा: सांगली*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*

मतभेद दोघातले
टाकावे मिटवून
वागावे विचाराने
प्रेमाने बदलून

समजदारी माणसाची
साक्ष माणुसकीची
प्रेमाची वागणूक
सभ्य वर्तणूक

पतिपत्नी देवासारखे
वादविवाद असभ्यतेचे
विनम्र शालीनता
योग्य रूप संस्काराचे

बेबनाव हा जिवनाला
दाखवतो मार्ग विनाशाचा
मांगल्य ,करूणा प्रेम हा
मार्ग योग्य सुखी जिवनाचा

तम राग व्देश भाव
हे बेबनावाचे. रूप
त्यागून ह्या सर्वांना
जगावे जिवन सुखरूप

सुखाच्या मार्गात येतो
बेबनाव हा राक्षस
समजदारी बंधुभाव करूणेने
दुर सारण्याचा ठेवा मानस

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*

रोज तुझी अन माझी
भेट ठरलेली असावी
व्याकुळ व्हावा जीव
तिथे बहानेबाजी नसावी

मांडीवर घेवून तुझे डोके
केसातून बोट हळुवार फिरवावे
त्या मदहोश आकाशात पाहून
मस्तीत प्रीतीचे गीत गावे

यावा अचानक पाऊस
मनसोक्त आपण भिजावे
शहारतील रोम रोम जेव्हा
एकमेकांना मिठीत घ्यावे

त्या फुलांचा गजरा
तुझ्या केसात माळावे
कधी यावा लटका राग तुला
मी प्रेमाने मनवावे

कधी उठेल मनात प्रश्न
वेळीच निराकरण व्हावे
उगाच बेबनाव नको नात्यात
नकोच ते क्षण हळवे

*डॉ. संजय भानुदास पाचभाई*
*नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*

अलबेल दिसे जरी
सुनामी उठते उरी
ओठावर हसू दिसे
नेत्रात आसू जरी.

भांड्याला लागते भांडे
तोडगा घरगुती
मायेच्या धाग्याने विनावी
अनमोल आपुली नाती.

पती-पत्नीचे नाते
आजन्म पवित्र बंधन
संस्कार धन लुटावे
बछड्यांचे संगोपन.

सहनशीलता अभाव
संशयाचे भूत भारी
बेबनाव विखारी
सदा संयमी संसारी .

*सौ विमल धर्माधिकारी*
*वाई सातारा*
*©सदस्या मराठी शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*

समाजात वावरताना
असावे दक्ष पदोपदी
सांगता येत नाही कधी
क्षण येतील विसंवादी

संवाद घडता घडता
दुखावते एखादे मन
अखंड मैत्री संपवतो
तेव्हा एक अघोरी क्षण

मने जपावी प्रत्येकाने
सुसंगतीला द्यावा वाव
एकमेकांशी एकनिष्ठ
होऊ न द्यावा बेबनाव

बेबनाव होता संपते
नाते खास जीवाभावाचे
नात्याची वीण दृढ होण्या
प्रयत्न व्हावे जिकिरीचे

सामंजस्य विचारातील
संपवते हा बेबनाव
ज्ञानाग्रज बोलतो जना
सोडा वेळीच अहंभाव

*दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’*
*उमरगा जि.उस्मानाबाद*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔹🔸➿➿➿➿
*बेबनाव*

चार हात लांबच् राहावे
बेबनाव कधी पदरी नाही पडावे
असे जरी वाटत असले
तरी क्षणोक्षणी तेच पुढ्यात पडते.

एका क्षणी नको वाटे
बेबनाव होता अंतरी काहूर माजे
क्षणातच वाटे मोकळे व्हावे
बेबनावा वाटे मनातील गाळ काढून घ्यावे..

नात्यांची वीण घट्ट करावे
बेबनावा ला ही हेवा वाटावे
कुणाच्या वाटेत आलो आपण
असे क्षणभर तरी त्याला वाटावे

काय वाईट काय चांगले
हे आपणच ठरवायचे
बेबनाव म्हणजे फक्त एक निमित्य
आपणच आपले मन पारखावे

उगीच कुणा का दोष दयावे
समंजस पणाने बोलते व्हावे
मात्र एक लक्षात घ्यावे
बेबनाव हे शस्त्र जवळी बाळगावे

हे शस्त्र नसता जवळी
कुणी लबाड अलगद फायदा घेतात
म्हणूनी फक्त शस्त्र म्ह्णूनी ठेवावे
पण माणूस पाहून वापर करावे

*सौ.ज्योती सुधीर कार्लेवार चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles