Home नागपूर 📗बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळीकार📗

📗बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळीकार📗

80

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : बेबनाव*🥀
*🍂बुधवार : ०३ / ०८ /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*बेबनाव*

प्रितीत नकोच बेबनाव
काळजावर उमटे घाव
नात्याच्या समृद्धीसाठी
कृतीत ओतावा सच्चा भाव

*तारका रुखमोडे*
अर्जुनी जि गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

असतो एखाद्यात बेबनाव
मात्र तो नसतो काही अडाणी
इथे तर सत्ता अंगुठा शाप घेतो
मग कशाला बेबनावाची कहाणी

*✍️ पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

*आपसात कधी ही*
*बेबनाव नसावा*॥
*जगाला नेहमी फक्त*
*सुसंवाद दिसावा*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

बेबनाव नसावा कधी कुटुंबात
टपलेले असतात धूर्त मार्गात
मिळे यांना आपसूक संधी
करती घात नात्यात

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

सत्तेसाठी लढती सारे
बेबनाव दावती फुकाचा
सत्तेची खूर्ची सर्वात भारी
लाज न ठेवतील लोकांचा

*सविता धमगाये नागपूर*
जि. नागपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

नात्यातील वितुष्टातून
भांडण उद्भवले
बेबनाव मग आपसात
वैमनस्याने वैर निर्मिले

*देशमुख शर्मिला शिवाजी, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

कसली ही लव मॅरेज
लग्नाआधी प्रेमाचा पाऊस
लग्नानंतर बेबनाव
फिटते नकली प्रेमाची हौस

*विवेक पाटील*
*मालेगांव (नाशिक)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

बेबनाव नकोय मैत्रीत
सुरेख नात्याला दृष्ट लागते
हे अनोखे नाते जपण्यासाठी
मन सदा लहानपणात जाते….

*वसुधा नाईक,पुणे*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

कुटुंबातील बेबनाव
नका मांडू समाजात
सुखदुःख असतात
सगळ्यांच्याच जीवनात…

*सौ.रजनी पोयाम वणी जिल्हा -यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿
*बेबनाव*

*राजकीय पक्षात बेबनाव*
*दोघात लढाई हमरीतुमरी*
*माघार कुणी ना घेती*
*धाव तयांची कोर्टकचेरी*

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖