राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे राष्ट्रीय महाअधिवेशन तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे होणार

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे राष्ट्रीय महाअधिवेशन तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे होणारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही भारतातील विविध ओबीसी समाजासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक ओबीसी संघटनांचा एक महासंघ आहे . या महासंघाचे प्रथम महाअधिवेशन दिनांक 7 ऑगस्ट 2016 ला नागपूर येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाले . या अधिवेशनामुळे महाराष्ट्र शासनाला नॉन किमिलिअरची मर्यादा साडेचार लाख रूपयांवरून सहा लाखापर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता .

महासंघाने 27 नोव्हेंबर 2016 ला ओबीसी महिला अधिवेशनाचे आयोजन केले होते . तसेच 8 डिसेंबर 2016 ला नागपूर येथील महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी एका लाखापेक्षा जास्त ओबीसी लोकांनी मोर्चा काढून जबर धडक विधानसभेवर दिली होती . याचा परिणाम होऊन महाराष्ट्र सरकारला पहिल्यांदाच ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी लागली . 7 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथील महासंघाच्या दुसऱ्या महाअधिवेशना नंतर नॉन क्रिमिलेअरची मर्यादा ही 6 लाखावरून 8 लाख रूपये करण्यात आली . देशातील सर्व ओबीसी समाजातील लोकांच्या एकत्रीकरण व एकजुटीचे हे फलित होते . या सोबतच भारत सरकारने प्रथमच नागपुरात पाचशे विद्यार्थ्यांचे वसतिगृह देण्यास मान्यता प्रदान केली आहे . 7 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया , वरली परीसर येथे तिसरे महाअधिवेशन घेण्यात आले होते . याचा परिणाम होऊन महाराष्ट्र राज्यात ओबीसी युवक व विद्यार्थ्यांसाठी ” महाज्यौती ” नावाने विकास महामंडळ स्थापन करण्यात आले . याद्वारे ओबीसी विद्यार्थ्यांना युपीएससी , एमपीसीसी , पीएच.डी , एम . फिल , जेईई / नीट व्यावसायिक वैमानिक , सनदी लेखापाल ( सीए ) व कंपनी सचिव ( सीएस ) इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे . तसेच ओबीसी युवकांना रोजगारांच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे . जिल्हा आणि तालुका पातळींवर ओबीसी विद्यार्थ्यासाठी वसतिगृह देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे . ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही 6 लाख रूपयाहून 8 लाख रूपये करण्यात आली आहे . राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे . शालेय विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे . अशा अनेक मागण्या या आंदोलनामुळे मान्य झाल्या आहेत . 7 ऑगस्ट 2019 रोजी हैद्राबाद येथे महासंघाचे चौथे महाअधिवेशन घेण्यात आले होते . या अधिवेशनाचाही परिणाम विविध राज्य आणि केंद्र सरकारवर पडून ओबीसी लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन सरकार तर्फे देण्यात आले . पुढे 5 वे महाअधिवेशन 7 ऑगस्ट 2020 रोजी कोविड- 19 प्रभावामुळे जागतिक पातळीवर अमेरिकेहून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आले होते , ज्यात संपूर्ण जग आणि भारतातील 5 कोटी पेक्षा जास्त ओबीसी बांधव सहभागी झाले होते . पुढचे 6 वे अधिवेशन 7 ऑगस्ट 2021 रोजी कोविंडच्या प्रादुर्भावामुळे लंडनहून ऑनलाईन घेण्यात आले होते . या जागतिक पातळीच्या अधिवेशनालाही भारतासह जगातील इतर ओबीसी बांधवांनी भरपूर प्रतिसाद दिला होता .

आता खालील नमूद सर्व मागण्यांकडे केंद्र आणि विबिध राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशपातळीवर आंदोलन चालवित आहे . याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये 7 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे . या अधिवेशनासाठी सर्व ओबीसी बंधू आणि भगनिंनी तन मन धनाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून हे महाअधिवेशन देशाच्या राजधानीत यशस्वी करण्यासाठी मदत करण्याची विनंती करण्यात आली व त्यास सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे .

सर्व मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता आणि त्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी या अधिवेशानाचे आयोजन करण्यात आले आहे . हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन भारताची राजधानी नवी दिल्ली येथील तालकटोरा इन्डोअर स्टेडियम मध्ये रविवार दि . 7 ऑगष्ट 2022 रोजी सकाळी 9 ते सांय 5 या वेळेदरम्यान आयोजित केले आहे .

या महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खा . शरद पवार यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी छत्तीसगढ़ राज्याचे मुख्यमंत्री मा.भुपेश बघेल , महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे , केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा . भगवान कराड , महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा . देवेंद्र फडणवीस , मा.खा. गणेश सिंग ( मध्यप्रदेश ) . मा . खा . राम मोहन नायडू ( टीडीपी , आंध्रप्रदेश ) , मा . खा . मार्गेनी भारत ( वायएसआरसटी , आंध्रप्रदेश ) , मा . खा . रामदास तडस ( वर्धा महाराष्ट्र ) मा.खा. बाळासाहेब धानोरकर ( चंद्रपूर , महाराष्ट्र ) , मा.खा. सुनीलकुमार पिंटू ( बिहार ) , मा.खा. डॉ . के . लक्ष्मण , मा . खा . बदुगुला लिंगाय यादव ( तेलंगणा ) , मा.खा. राम चंदर जानग्रा ( नवी दिल्ली ) , मा.खा. वद्दीराजू रवीचंद्र ( तेलंगणा ) , मा.खा. मिसा भारती ( बिहार ) , महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा . आ . छगन भुजबळ आदी मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत . तसेच मा , हंसराज अहिर ( माजी केंद्रीय मंत्री ) , महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा . आ . नाना पाटोले , महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा . आ . चंद्रशेखर बावणकुळे , महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा . आ . विजय वडेट्टीवार , महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा . जयदत्त क्षिरसागर , महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा . आ . परिणय फुके , दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या आमदार मा . राजकुमारी धिल्लन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे .

याप्रसंगी बिहारचे माजी मुख्यमंत्री मा . लालुप्रसाद यादव यांचा आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे .

या पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक मा . डॉ . अशोक जिवतोडे आहेत तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . बबनराव तायवाडे स्वागताध्यक्ष आहेत . या महाअधिवेशनाची भुमिका व प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सल्लागार ख्यातनाम विधीतज्ञ अॅड . फिरदोस मिर्झा मांडतील .

दुसऱ्या सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व सर्वोच्य न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा.व्ही . ईश्वरैय्या असून या सत्रात माजी आमदार मा . डॉ . संजय कुटे , मा . आमदार किसन काथोरे , तेलंगणातील माजी खासदार मा.व्ही . हनुमंतराव , हरीयाणातील माजी खासदार मा . राजकुमार सैनी , तेलंगण्यातील माजी खासदार मा . मधु गौड याक्षी , राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा . महादेवराव जानकर , महाराष्ट्र राज्या माजी मंत्री मा . आमदार जयंत पाटील , मा . आमदार अॅड . अभिजित वंजारी , ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मा.शब्बीर अहमद , तेलंगणा राज्य बॅकवर्ड क्लास वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास गौड , बॅकवर्ड वेलफेअर असोसिएशनचे आंध्र प्रदेशचे राज्य अध्यक्ष केसाना शंकर राव , माजी राष्ट्रपती मा.झैलसिंग यांचे नातू मा . इंदरजित सिंग , ओबीसी मोर्चा पंजाबचे नेते मा . जसपालसिंग खिवा , ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिव मा . जी . करूणानिधी ( तामिलनाडू ) , एससी एसटी आयोगाचे माजी अध्यक्ष मा . डॉ . बिजय सोन्कर शास्त्री आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील .

वरील सर्व मागण्यांकडे केंद्र आणि विविध राज्य सरकार यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी या महाअधिवेशनाचे आयोजन केले आहे . राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे हे सातवे महाअधिवेशन रविवार दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा इन्डोअर स्टेडियम मध्ये सकाळी 9 ते सांय 5 वाजेपर्यंत आयोजित केलेले आहे .

या महाअधिवेशनांस उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी संलग्नित संघटना बीसी असोशिएशन ऑफ तेलंगणा , बीसी वेलफेअर असोसिएशन ऑफ आंध्र प्रदेश , ओबीसी महासंघ , ऑल इंडिया ओबीसी एम्प्लॉइज फेडरेशन ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस फेडरेशन , नॅशनल फोरम फॉर एन्फोर्समेंट ऑफ सोशल जस्टीस , मोस्ट बॅकवर्ड क्लासेस फेडरेशन , ओबीसी मोर्चा पंजाब , पिछडा वर्ग विकास मंच , ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन , राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ , राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ , राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ , राष्ट्रीय ओबीसी अधिकारी – कर्मचारी महासंघ , राष्ट्रीय ओबीसी महिला अधिकारी – कर्मचारी महासंघ व राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ इत्यादी संघटनांच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles