
वानाडोंगरी रिजेंट इंग्लिश शाळेमध्ये खाजगी शिकवणीचा गोरखधंदा
_खाजगी शिकवणीच्या संचालकाचा व मुख्याध्यापिकेचे साटे-लोटे_
प्रमोद गाडगे, हिंगणा प्रतिनिधी
हिंगणा :- रिजेंट इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिकेचे बाजूलाच असलेल्या खाजगी शिकवणी संचालका सोबत साटे-लोटे असल्याने या शाळेच्या माध्यमिक विद्यालयाच्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अक्षरशा: पिळवणूक सुरू केली आहे. खाजगी शिकवणीचा संचालक व मुख्याध्यापिका सोबत संगनमत करून मिळकतीचा मलिदा खात आहे.
खाजगी शिकवणीचे वर्ग शाळेच्या ईमारती मध्येच भरविले जातात विद्यार्थी यांनी शिकवणी लावण्यास नकार दिल्यास त्यांना मार्क कमी देण्याची धमकी दिली जात आहे.
आतापर्यंत अनेक पालकांनी या प्रकरणाच्या संदर्भात शिक्षण विभागाकडे व पोलीस विभागाकडे तक्रारी केल्या असून संबंधित विभाग देखील या प्रकरणाकडे हेतू पूरस्पर डोळेझाक करीत आहे.या प्रकरणाचा सोक्षमोक्ष न लागल्यास पालक वर्ग मोठे आंदोलन सुरू करणार असल्याचे सुद्धा समजते.या सर्व अनागोंदी कारभारामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्याची नावे शाळेतून काढून टाकली आहे.