अब्दुल सत्तारांना राज्याचे शिक्षणमंत्री करा

अब्दुल सत्तारांना राज्याचे शिक्षणमंत्री करा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे: राज्यातील बहुचर्चित टीईटी घोटाळ्यात सत्तारांच्या मुलीचे नाव परीक्षा न देता उत्तीर्ण झाल्याचे सर्वश्रूत झाले असल्याने, याबाबतचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत,पोहचल्याने व त्यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आक्रमक झाली. आमदार अब्दुल सत्तार यांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री करावे म्हणून उपरोधक पध्दतीने आंदेलन करण्यात आले.

महिला प्रदेशाघ्यक्ष आमदार विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डेंगळे पूल येथे आंदोलन करण्यात आले. चव्हाण म्हणाल्या की, ईडीच्या भीतीपोटी अनेक आमदार भाजपामध्ये सामील होत आहे. त्यामुळे हे सरकार गद्दारांचे आहे आणि गद्दारांकडून आणखी काय अपेक्षा असते ते आपल्याच घराचा उद्धार करणार.

प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले अब्दुल सत्तारांना भ्रष्टाचारी म्हणू नका कारण ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघालेले आहेत. ते अत्यंत कुटुंबवत्सल आहेत त्याप्रेमापोटी त्यांच्या मुली अपात्र असतानाही पात्र झाल्या आहेत आणि आपल्याच संस्थेवर त्यांनी त्यांना नोकरीही दिलेली आहे.

असे महान शिक्षणतज्ञ जर या राज्याला शिक्षण मंत्री म्हणून लाभले तर या ईडी सरकारच्या शिरपेचात अजून ऐक मानाचा तुरा रोवला जाईल तसेच पुढील काळात अनेक नापास विद्यार्थीही पास होतील व अपात्र विद्यार्थांना खूप मोठ्या संधी उपलब्ध होतील अशी बोचरी टीका प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles