चिमुकल्या ‘अनुया’ने पोलीस अधिका-यांना राखी बांधून मागितली रक्षणाची ओवाळणी

चिमुकल्या ‘अनुया’ने पोलीस अधिका-यांना राखी बांधून मागितली रक्षणाची ओवाळणी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. त्यात या पवित्र नात्यास मग वयाचे बंधन उरत नाही. आपली भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे.

आपल्या संस्कृतेला शोभेल असेच काही राज्याच्या उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आज रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्यय आला. एक चिमुकली ‘बाहुली’ नागपूरकर अनुया आचार्य. ती दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान येथे शिक्षण घेत आहे. ती दररोज शाळेला जाते. परंतु तिला शहरातील पोलीस दररोज मदत करतात. शाळेतून आल्यावर रस्ता क्रॉस करतांना ‘ड्युटी’वर असलेला कोणताही पोलीस कर्मचारी अनुयास आनंदाने मदत करतो. म्हणून तिने आज रक्षाबंधनाच्या दिवशी शहरातील सर्व पोलिसांना, ट्राफिक पोलिसांना राखी बांधली. तसेच नागपूरचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार, जॉईंट कमिशनर दोरजे अवस्थी मॅडम आणि ऑक्सिजन मॅन प्यारे खान या सर्वांना राखी बांधून सदैव रक्षण करण्याची ओवाळणी मागितली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles