Home ताज्या घटना नागपूर जनरल लेबर युनियन ( सी आय टी यू )चे जिल्हा ...

नागपूर जनरल लेबर युनियन ( सी आय टी यू )चे जिल्हा अधिवेशन संपन्न.

93

नागपूर जनरल लेबर युनियन ( सी आय टी यू )चे जिल्हा अधिवेशन संपन्न.पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_कॉ. राजेन्द्र साठे – अध्यक्ष व कॉ.दिलीप देशपांडे यांची सरचिटणीस पदी निवड_

नागपूर: येथील सी आय टी यू संलग्न संघटना नागपूर जनरल लेबर युनियन चे जिल्हा अधिवेशन ए के गोपालन भवन येथे आज संपन्न झाले. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष – कॉ. मोहम्मद ताजुद्दीन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर शहिदांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाच्या पुढच्या वाटचालीची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सीटू आशा सांस्कृतिक मंच द्वारे वंदना पंडित, प्रीती मेश्राम, निकिता सहारे, सीमा गजभिये, नीलिमा कांबळे यांनी गायलेल्या सु मधुर क्रांतिकारी गीताने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन कॉ. विश्वनाथ असई यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख कॉ.अशोक वडनेरकर होते. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव निमित्त स्वतंत्र प्राप्तीच्या आधीची परिस्थिती, क्रांतिकारकांनी केलेले आंदोलन कामगारांची स्थिती व कामगार चळवळीची सुरुवात यावर मार्गदर्शन केले. आज कामगारांबद्दल असणारी सरकारची भूमिका व कामगारांनी आपल्या अधिकार मिळवण्या करता कोणता मार्ग अवलंबून आपल्या अधिकाराकरता कामगार संघटना बळकट करावी. यावर मार्गदर्शन केले. मोदी सरकारने नवीन चारही कामगार कायदे रद्द करून जुन्या कायद्यानुसारच काम चालवावे ही भूमिका मांडली.कार्यक्रमाचे संचालन कॉ. मोहम्मद ताजुद्दिन यांनी केले. त्रीवार्षिक अहवाल वाचन कॉ. दिलीप देशपांडे यांनी केले. त्रीवार्षिक हिशेब कोषाध्यक्ष – कॉ. रामेश्वर चरपे यांनी मांडला. अहवालावर ६ प्रतिनिधीनी चर्चा केली. कार्यक्रमाला ३७ प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिवेशन कार्यक्रमाला अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष – विठ्ठल जुनघरे, एम एस एम आर ए चे राज्य सचिव – अभिजीत कुलत, अखिल भारतीय जनवादी महिला समितीचे अध्यक्षा – मंगला जुनघरे, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन च्या महासचिव – प्रीती मेश्राम यांनी आलेल्या सर्व प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.

भोजन नवीन 21 लोकांची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून कॉ.राजेंद्र साठे यांची अध्यक्षपदी, कॉ. दिलीप देशपांडे यांची सरचिटणीस पदी, कॉ. रामेश्वर चरपे यांची कोषाध्यक्ष पदी त्याचबरोबर ३ उपाध्यक्ष व ३ सचिव १२ सदस्य अशी नेमणूक करण्यात आली. कार्यक्रमाचे समापन नव निर्वाचित अध्यक्ष – कॉ. राजेंद्र साठे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात संघटना वाडी करता कृषी प्रयत्न करावे व संघटना वाढ झाल्याशिवाय आमचे अधिकार आम्ही मिळवू शकत नाही यावर विशेष भर दिला. सदस्यता नोंदणी हा संघटनेच्या पाया असून नवीन सदस्य नोंदणी करता कोणती व कशी पावले उचलावी यावर विशेष भर देऊन मार्गदर्शन केले.