
छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन
नागपूर: ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या स्थापना दिवसानिमित्य तसेच विश्व छायाचित्रण दिवसाचे औचित्य साधून गत 27 वर्षापासून दरवर्षी 19 ऑगस्टला क्लब, प्रायोजकांच्या सहकार्याने, व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांकरिता छायाचित्र स्पर्धा ठेवून, भव्य प्रदर्शनाचे आयोजन केल्या जात आहे.
या वर्षी ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब नागपूर, के गणेश अकॅडमी, विठोबा आयुर्वेदिक दंत मंजन आणि टुथपेस्ट, व कै. सुधाकर वासुदेवराव कुळकर्णी स्मृती प्रित्यर्थ कुळकर्णी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने (19 ऑगष्ट) जागतिक छायाचित्रण दिन व ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्य 19 ते 21 ऑगष्ट, 2022 या दरम्यान जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, वर्धा रोड, नागपूर येथे व्यावसायिक व हौशी छायाचित्र प्रेमीकरिता छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या छायाचित्र स्पर्धेत 1) सण व कार्यक्रम (2) प्रवास व मार्ग (3) निसर्ग व वन्य जीव हे तीन विषय देण्यात आलेले होते. वय, व्यवसाय, शिक्षणाचे कोणतेही बंधन नव्हते. यात 1) सण व कार्यक्रम विषयांत 202 (2) प्रवास व मार्ग विषयांत 235 (3) निसर्ग व वन्य जीव विषयात 237 अशा एकूण 674 प्रवेशिका प्राप्त झाल्या. स्पर्धेतील निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन 19 ऑगष्ट ते 21 ऑगष्ट 2022 दरम्यान जवाहरलाल दर्जा आर्ट गॅलरी, लोकमत चौक, वर्धा रोड येथे करण्यात आलेले असून, प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 19 ऑगष्ट, 2022 रोजी सकाळी 10 वाजता श्री कार्तिक शेंडे संचालक, विठोबा इंडस्ट्रीज प्राय. लिमिटेड यांचे हस्ते, पमुख पाहुणे पं. श्री शंकरप्रसाद अग्नीहोत्री अध्यक्ष जय महाकाली शिक्षण संस्था, वर्धा, सन्माननीय पाहुणे श्री चंद्रपाल चौकसे पर्यटन मित्र, रामटेक, नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
19 तारखेला सायंकाळी 4 ते 5 या वेळेत श्री के. गणेश यांचे अॅडोब कियेटीव्ह क्लाउडचे वैशिष्ठ्ये या विषयावर, दिनांक 20 ऑगष्ट रोजी श्री समरेश अग्रवाल यांचे ट्रेडींग व्हिडीओ रील्स एडीटींग, या विषयावर व दिनांक 21 ऑगष्ट, 2022 रोजी डॉ. मातरिश्वा व्यास यांचे फोटो स्टोरिज या विषयावर व्याख्यान होईल. सर्वांसाठी प्रवेश निःशुल्क आहे.
प्रदर्शनाचे समापन व पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवार दिनांक 21 ऑगष्ट, 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रमुख अतिथी श्री विवेक रानडे, फॅशन फोटोग्राफर, नागपूर सन्माननीय श्री मोहन नहातकर सचिव एम. पी एज्युकेशन सोसायटी, नागपूर, मेज. डॉ. प्रशांत निंबाळकर संचालक प्रेसिशन स्कॅन, नागपूर यांच्या उपस्थितीत होईल.
प्रत्येक विषयांत प्रथम पारितोषिक 15000/- रूपये, व्दितीय पारितोषिक 11,000/- रूपये, तृतीय पारितोषिक 7,000/- रूपये व अत्तेजनार्थ 5000/- रू. व 3000/-रु. रोख पारितोषिके दिल्या जातील. ही प्रदर्शनी सकाळी 11 ते रात्री 8 वाजे पर्यंत प्रेक्षकांसाठी खुली राहील.