गोविंदा आला रे..! हायकू काव्य परीक्षण

गोविंदा आला रे..! हायकू काव्य परीक्षण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️तारका रूखमोडे, गोंदिया

गोविंदा आला
जमे गोपाल मेळा
आनंद काला

गोविंदा आला रे आला ..प्रेमाची वाहणारी चैतन्यमयी धारा..ज्ञान व दिव्यत्वात सामावलेला जीवनभक्तीचा प्रत्यक्ष ब्रम्हांड सारा.. कुळ उद्धारकर्ता यशोदेचा आखो का तारा.. अलगुजाच्या सुराने अवघ्या प्राणिमात्राला मोहिनी घालणारा मुरलीधर न्यारा.. निखळ मैत्रीच्या रूपात नवविचारांचं दालन खुलं करणारा चराचर व्याप्त हाच तो भावभक्तीचा प्याला.. आनंदकाला.

गोपाल काला
भक्ती एकोपा मेळा
आठवलीला

घराघरात अष्टमीला कान्हाचं आगमन झालं.. अवघ्या दिड दोन दिवसाच्या या शुभ पर्वात हर्षोल्हासाचं चैतन्य चराचरात नि तनामनात दरवळलं.. बालगोपालांचं व युवकांचं मन त्या दहीहंडीच्या मनोऱ्यातही पोहोचतं ..नि सुरू होतात हृदयंगम बाललीला.. सर्व युवकांच्या तनामनात जणू गोविंदा संचरतो.. गरीब श्रीमंतीच्या जातीभेदाच्या सीमा ओलांडून एकमेकांच्या हातात हात घेऊन उंच मनोरे रचून दहीहंडी फोडली जाते .. सर्व वैरत्वभाव विसरून विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन नि बाललीलांची आठवण पुन्हा हृदय साठवण केली जाते.. ज्या दूध,दही, लोण्यावर मनुष्याचा पिंड पोसला जातो ते दूध दही सुख समृद्धीचे प्रतीक… वरच्या थरापासून ते खालच्या थरापर्यंत सर्व लोकांना ही समृद्धी वाहती व्हावी हाच यामागचा सामाजिक उद्देश .. यातून स्नेहाचे, एकात्मतेचे,मैत्रीचे भावबंध निर्माण होतात परमात्म्याचं युवकांच्या रूपात दर्शन घडतं व श्रीहरी मनात कायमचा ठसतो.

किती चैतन्य या गोपालकाल्यात… सुसंस्कार भक्तीप्रवणता, कुविचार त्याग,समता बंधुत्वाची भावना… खरंच.. या उत्सवातून अभिव्यक्त होणारे ज्ञान विज्ञान जितके चीर पुरातन तितकेच नित्य नूतन अमर आहे.. गोविंदाच्या प्रेममयी भक्तीत अवघा संसार रंगतो. खरंच हा गल्लीतला गोपालकाल्याचा आनंद कुठल्याच कोपऱ्यात नाही.

गोपालकाला उत्सवाचं साजेसं औचित्य साधून आ. राहुल सरांनी चित्र दिलेलं ..नि अवघा हायकू समूह त्या गोपालकाल्यात स्वप्रतिभेचा काव्यप्रसादमाधुर्यगुणात रंगून लिहीता झाला.. असेच व्यक्त होत राहा… सुंदर काव्य प्रतिभा आज सगळ्यांची सजली.. सर्वांच्या लेखणीस हार्दिक शुभेच्छा..!

✍️थोडसं नवप्रतिभावंतांसाठी

मनाची तन्मयता, चित्र प्रसंगाची सुसंबंद्ध गुंफण व अर्थ चमत्कृतीने साध्य होणारी प्रभावी शब्दशैली वापरून सौंदर्यदृष्टीच्या भावाभिव्यक्तीने हायकू काव्यरचना प्रसादपूर्ण रसप्रवाही करा. आ. राहुल सरांनी मला परीक्षणीय लेखणीची संधी दिली त्याबद्दल त्यांची हृदयस्थ आभार.

प्रा तारका रुखमोडे
अर्जुनी मोर जि गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles