न्यू मून शाळेत गोपालकाला उत्सव धुमधडाक्यात
तारका रूखमोडे
अर्जुनी मोर: स्थानिक न्यू मून इंग्लिश मिडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथे जन्माष्टमीच्या पावन पर्वावर दि. 20/08/२०१३ ला गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे । सचीव श्री. ओमप्रकाशसिह पवार, संचालक श्री संतोष बुकावन, श्री गिरीष पालीवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्ताने विदयार्थ्यांच्या राधा-कृष्ण वेशभुषा स्र्पधेचे व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्व विदयार्थ्यांनी त्यात उत्स्फुर्तपणे भाग घेतला.
स्व. राजीव गांधी जयंती निमित्ताने प्रतिमेला माल्यार्पण करून सद्भावना शपथ घेण्यात आली. दहीहंडी फोडून गोविंदा आला रे च्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विदयार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हाच प्रत्येक उपक्रमामागील आमचा उद्देश आहे असे विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थासचीव ओमप्रकाशसिंह पवार म्हणाले. प्रा-तारका रुखमोडे यांनी प्रास्ताविकरुपात विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सचीन मेश्राम प्रा.उंदिरवाडे व प्रा. तारका रुखमोडे व प्रमुख अतिथींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
यशस्वीतेसाठी प्रा. सचीन मेश्राम, प्रा. राकेश उंदिरवाडे, प्रा. तारका रुखमोडे , कुंजना बडवाईक, हिना लांजेवार, प्रतिक्षा राऊत,श्री. बांडे यांनी परिश्रम घेतले. लीना चचाने यांनी सूत्रसंचालन केले व आभार त्रिवेणी थेर यांनी मानले.