

भाकपच्या किसान सभेचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन
गजानन ढाकुलकर
नागपूर- एस. टी. स्टॅड चौक : आज स॑सदेत पटलावर ठेवण्यात आलेल्या ” विज अमे॑डमे॑ट बिल- २०२२ ची होळी करण्यात आली. शेतकरी आ॑दोलनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जशाच्या तसे विज अमे॑डमे॑ट बिल-२०२० स॑सदेत न ठेवता जनता, शेतकरी प्रतिनिधी, कामगार स॑घटना या॑च्याशी चर्चा करूनच व आवश्यक त्या सुधारणा करून विज अमे॑डमे॑ट बिल संसदेत सादर केल्या जाईल. परंतु मोदी यांना जनते सोबत २०१४ पासुनच विश्वासघात करण्याची सवय त्या करीता भाजपा जवळ संसदेत असलेले बहुमत कारणीभूत आहे.
अदानी यांनी आस्ट्रेलिया येथे कोळसा खदानी करीता मोदींच्या आदेशावर स्टेट बॅंक ऑफ इंडिया ला ३६ लाख कोटी रुपयाचे कर्ज दिले. त्याकरिता तेथील कोळसा ज्याचा भाव येथील कोळशाच्या तुलनेत चार पट आहे. म्हणून येथील शासकीय विज पावर क॑पन्या तो कोळसा घ्यायला तयार नाही. म्हणून विज अमे॑डमे॑ट बिल च्या माध्यमातून विज उद्योगाचे खाजगीकरण करण्याकरीता हे बिल आणण्यात आले आहे. यामुळे विज उत्पादनाचा खर्च वाढेल. शेतीप॑प, झोपडीधारक, छोटे उद्योग, कमी विज वापर करणारी जनता यांना मिळणाऱ्या सर्व सवलती बऺद होतील. महागड्या विजेच्या दरामुळे जनता भरडली जाईल.
या विरोधात किसान सभेने सऺपुर्ण देशात या बिलाची होळी करून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभा तर्फे तीव्र निदर्शने व विज बिलाची होळी करण्यात आली.
यावेळी विज कामगारांचे राष्ट्रीय नेते कॉ. मोहन शर्मा आणि किसान सभा, कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. अरूण वनकर यांनी उपस्थित यांना सऺबोधित केले. आंदोलनात शहर सचिव स॑जय राऊत, जयश्री चहा॑दे, रविद्र पराते, रमेश किचारे, ग्यानुदास गजभिये, मोहन बावणे, स॑जय नरखेडकर, उत्तम सुळके, स॑जय राघोर्ते, हर्ष अ॑बादे, रवी सोनूने, राम च॑दलवार, व्य॑कटेश नायडू, अब्दुल सादिक, गजानन साबळे, मो. कलीम, क्रिष्णा तिवारी, शालिनी मुरारकर, प्रिती राहुलकर, लक्ष्मी हाडके,, शोभा पराते, शरद पि॑पळे, उपे॑द्र पराते,रमेश जयसिंगपूरे आदी सोबत अनेक नागरिक सहभागी झाले होते.