
जागतिक फोटोग्राफर दिनी प्रशांत नाईक यांचा सत्कार
रायगड: अलिबाग येथे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त रायगड फोटोग्राफर अॅड व्हिडिओग्राफर असोसिएशनशी संलग्न आलिबाग फोटोग्राफर्स अॅड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने अलिबाग मधील ज्येष्ठ छायाचित्रकार आदरणीय प्रशांत नाईक उर्फ़ दादा नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी रायगड फोटोग्राफर अॅड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता, मजी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नाईक, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष तुषार थळे, खजिनदार राकेश दर्पे, सल्लागार सुरेश खडपे, वामन पाटील, सदस्य विवेक पाटील, विकास पाटिल, मिलिंद भालवणकर, उपस्थित होते.
दादा नाईक गेली ४० वर्षे फोटोग्राफी क्षेत्रात काम करत आहेत. दरवर्षी अलिबाग फोटोग्राफी असोसिएशन च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्या वाटप, दहावी, बारावीत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम घेऊन जागतीइक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो.