महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी लोमेश वऱ्हाडे

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य कार्याध्यक्षपदी लोमेश वऱ्हाडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वर्धा : पुणे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळाची सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, वर्धा जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी राज्यातून सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व समन्वय समितीचे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीस शिक्षक नेते कै शिवाजीराव पाटील आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी सर्वांनुमते राज्य कार्यकारी मंडळाच्या कार्यकारणीमध्ये मोठे बदल करण्याचे सुचविले यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली कार्यकारी मंडळ सभेला संबोधित करताना अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील म्हणाले.

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी लवकरच संबंधित मंत्री महोदयांबरोबर शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे ठोस नियोजन करण्यात येईल तसेच भविष्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ बळकट करण्यासाठी राज्य जिल्हा व तालुकास्तरीय संघटन मजबूत करण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष घालणार निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये काम करण्याची भविष्यात संधी देणार असे सांगितले.

यावेळी सर्वच जिल्हाध्यक्षांनी आपली मते मांडून कार्यकारणी मध्ये नव्यांना व जुन्यांना संधी देण्याची आग्रही मागणी केल्यामुळे राज्याच्या समन्वय समितीच्या मार्गदर्शनानुसार माजी राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी राज्य नेतेपदी माननीय माधवराव पाटील यांची निवड करण्यासंदर्भात सूचना मांडली त्यास कार्यकारी मंडळ सभेच्या वतीने ज्येष्ठ सल्लागार वसंतराव हारुगडे यांनी अनुमोदन दिले व राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतेपदी माननीय माधवराव पाटील आप्पा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच कार्यकारी मंडळाने नेते माधवराव पाटील यांना राज्य कार्यकारीणी पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार देण्यात आले त्यानुसार राज्य शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष म्हणून माननीय केशवराव जाधव बारामती राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस माननीय लायक पटेल लातूर राज्य शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष माननीय लोमेश वराडे वर्धा तसेच राज्य शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माननीय संभाजी बापट कोल्हापूर यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या.

यावेळी राज्य शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजाराम वरुटे ज्येष्ठ सल्लागार दिरा भालतडक वसंतराव हारुगडे बाळासाहेब काळे तुकाराम कदम ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत सांगली जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी पालघर जिल्हाध्यक्ष पिंपळे रायगड जिल्हाध्यक्ष म्हात्रे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष नागवेकर जालना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब झुंबड पुणे जिल्हा अध्यक्ष मुजुमले पुणे महानगरपालिका अध्यक्ष चोरमुले सोलापूर जिल्हा अध्यक्ष यादवाड यवतमाळ जिल्हाध्यक्ष जाधव सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष शिवानंद भरले सातारा जिल्हा सरचिटणीस प्रदीप घाडगे धुळे नंदुरबार बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles