केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व ऑस्ट्रेलियन शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांची द्विपक्षीय बैठक संपन्न

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व ऑस्ट्रेलियन शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांची द्विपक्षीय बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्‍ली: केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली, तसेच पश्चिम सिडनी विद्यापीठात (WSU) भारत ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषदेच्या (AIEC) 6 व्या बैठकीत क्लेअर यांच्यासोबत सह अध्यक्ष म्हणून सहभागी झाले.

द्विपक्षीय बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, नवोन्मेष तसेच उद्योजकतेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासंबंधात अतिशय फलदायी चर्चा केली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियन विद्यापीठे व कौशल्य विकास संस्थांना भारतात शिक्षण परिसर उभे करण्यासाठी, तसेच भारतीय शिक्षणसंस्थांशी सहकार्य करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी आमंत्रित केले. प्रधान यांनी महामहिम जेसन क्लेअर यांना या वर्षाअखेरीस भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले.

अध्ययन, कौशल्य विकास आणि संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत दोंन्ही मंत्र्यांचे एकमत झाले. भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान धोरणात्मक व सर्वसमावेशक भागीदारीमध्ये शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा असेल.

शिक्षण, कौशल्य विकास, व संशोधन क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध मजबूत होण्यासाठी भारत ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषद (AIEC) हे उत्तम व्यासपीठ असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी परिषदेच्या 6 व्या बैठकीत सांगितले. परिषदेची सातवी बैठक पुढील वर्षी भारतात घेण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियन पथकाला आमंत्रित केले.

आयुर्वेद, योग, कृषिक्षेत्र, इत्यादी क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे संशोधन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. कौशल्य प्रमाणीकरण, तसेच खनिकर्म, दळणवळण व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. भारताने डिजिटल विद्यापीठ आणि गतिशक्ति विद्यापीठ स्थापन केले असून त्यांचे पाठ्यक्रम विकसित करण्यासोबत इतर अनेक बाबतीत दोन्ही देशांना एकत्रितपणे प्रयत्न करता येतील , असे त्यांनी सुचवले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles