महा.अंनिस हिंगणा शाखेतर्फे नरेंद्र दाभोलकर याना अभिवादन
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा हिंगणा तर्फे शहीद नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा कार्यकारिणी )च्या प्रधान सचिव निलिमाताई गोबाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या या कार्यक्रमात महिलांचा सक्रीय सहभाग होता. या प्रसंगी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मुख्य सुत्रधारांचा शोध लाऊन त्यांना शासनाने त्वरित अटक करावी अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली. कार्यक्रमाला काकडेताई, रुपाली बोंडे , विश्वंजरताई, देशमुखताई, चव्हाणताई , बोरकरताई पवारताई या प्रामुख्याने उपस्थित होत्या.