
‘ती’ बातमी खोटी असल्याचा MSRDC चा खुलासा
दि. 25 ऑगस्ट 2022 रोजी हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पॅकेज क्र. 5 मधील मालेगाव (ज.) तालुक्यातील साखळी क्र. 219 / 233 वरील व्हेईक्युलर ओव्हरपास (वाहनांसाठी उन्नत महामार्ग) च्या ठिकाणी संध्याकाळी 5.30 वाजता क्रेनच्या सहाय्याने काँक्रीट गर्डर पुलावर ठेवण्याचे काम सुरु होते. क्रेनच्या सहाय्याने गर्डर वर उचलत असतांना क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लीप झाल्यामुळे गर्डर पुर्ण चढण्यापूर्वीच खाली जमिनीवर कोसळले.
पूल कोसळल्याची बातमी खोटी असून काम करतांना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. तथापी दुर्दैवाने क्रेन घसरल्यामुळे अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही जिवीत व वित्त हानी झालेली नसून काम पुर्ववत सुरु करण्यात आलेले आहे.
*मुख्य अभियंता आणि प्रकल्प संचालक एन.एम.एस. डु.एम. (मार्ग.), कॅम्प ऑफिस, अमरावती*