‘या’ कृषीपुत्राचे ऋण न फेडण्यासारखेच..!!!

‘या’ कृषीपुत्राचे ऋण न फेडण्यासारखेच..!!!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️तारका रूखमोडे, गोंदिया

घामाच्या धारा
प्रकटल्यात दारा
सन्मान करा

श्रावण हा सणांचा व हर्षोल्हासाचा महिना. जिकडे तिकडे चैतन्य पसरलेले, सृष्टीने नववधूचे रूप धारण केलेले. शेताचं हिरवं रूप धारण करण्यात व त्यातून सोनं निर्माण करण्यात ज्याचं सर्वात मोठ योगदान आहे तो म्हणजे बळीचा सर्जाराजा.. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता जमिनीतून मोती पिकवण्यासाठी इमाने,इतबारे थकल्याची जाणीव न होऊ देता अविरत कष्टाचे हे ध्यान उभे बांधावरी..नांगर घेवोनिया खांदयावरी, चाले बळीच्या संगे.. त्याचा सखा, मित्र, लेकरू बनूनी.

‘बैलाच्या खुराने शेती केली की घरात समृद्धी येते.. असं माननारा बळीराचा.. दुष्काळात सगळ्यांनी साथ सोडली तरी वाळलेला कडबा गोड मानून मालकाला आजन्म सोबत करणारा सर्जाराजा.. कृषीराजा वृषभाविना पोरकाच ..खरंच वृषभाच्या कष्टाची तुलना कशाशीच करता येत नाही.. अवघ्या जगाच्या पोटासाठी मळे पिकतात ते यांच हरीरुपाच्या भरवशावर ..हाच तर उभ्या जगाचा पोशिंदा.. अशा या कृषीपुत्राचे ऋण न फेडण्यासारखेच.. पण तरीही या कष्टदैवताप्रती कृतज्ञ व उतराई होण्यासाठी ..सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याचा उत्सव साजरा केला जातो.

वृषभ धन
लक्ष्मी करे औक्षण
कष्टाची जाण

वर्षभर खांद्याला खांदा लावून, मालकासोबत घामाच्या धारा वाहणा-या या राजाला पोळ्याच्या दिवशी गळ्यात घुंगुरमाळा, पाठीवरती मखमली झूल, बलभद्र पर्णाने शृंगारून, शिंगांना रंगोटी करून.. गावच्या आकरावर बैलपोळा भरवला जातो.व सोबतीलाच बळीचाही सन्मान म्हणून डोक्यावर मानाचा फेटा बांधला जातो. बळी कष्टाची जाण राखतो. पोळा फुटला की गावक-यांची धम्मालच धमाल-त्यांच्या आनंदाला पारावर उरत नाही. मिरवणूक काढून घरोघरी कष्ट दैवताला त्याची खूर उंबरठ्याला लागावी व अन्नपूर्णेच्या हातून नैवेदय दाखवावं म्हणून नेलं जातं. घरातील गृहलक्ष्मी सर्जाची मनोभावे पूजा करते. ज्याच्यामुळे घरात मोत्याचं दान नि सरपण आलं अशा या सच्च्या लेकराचे पुरणपोळीी नि पंचपक्वानरुपी नैवेद्याचा घास चारते . नि कृतज्ञताभाव व्यक्त करते. तिला त्याच्यात ईश्वरच दिसतो.मनोभावे ती त्याचा सन्मान करते. व वैरत्वभाव या निमित्ताने विसरला जातो

असा हा पोळयाचा सोहळा. भौतिक गजबजाटातही या संस्कृती उत्सवाचं विशाल दृष्टीकोनातून साहित्यात जतन व्हावं.. व हायकूकाव्यातही या याचं रेखाटन व्हावं म्हणून आ. राहुल सरांनी हे वास्तव बोलके चित्र लेखनासाठी दिलेलं. प्रतिभावंतांनी सुंदर लेखन केलंय. आपल्या सुंदर काव्यलेखनास अभिनंदनीय शुभेच्छा💐💐

थोडस मनातलं_

परीक्षणीय रचना वाचताना चित्रातील क्षण आपण अचूक टिपलेत पण कलाटणीत प्रतिभेची जरा कमतरता जाणवली. कलाटणी देताना भावोद्गार हृदयातून परिणामकारक स्फुरू द्या.. नावीन्य (शब्दांचे) जपा. पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🙏💐

प्रा सौ तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, जि गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles