Home गावगप्पा अत्री येथील तीन जिवलग विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

अत्री येथील तीन जिवलग विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

206

अत्री येथील तीन जिवलग विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा जवळील अत्री गावातील तीन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संकेत बालक रंगारी (१८), साहिल नरेश रामटेके (20) व प्रणय योगीराज मेश्राम (१८) हे तिघे मित्र कोंढा/कोसरा या गावापासून सात किमी अंतरावर असलेल्या पूर्वेकडील अत्री गावाचे असून ते पोहण्यासाठी अत्री – फनुली रोडवरील बोडीत (लहान तलाव) गेले होते.

दरम्यान, पोहताना एक मित्र पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्र गेला. तोही पाण्यात बुडू लागला आणि या दोघांना वाचवण्यासाठी तिसरा मित्र गेला तेव्हा तोही पाण्यात बुडाला. संकेत व प्रणय हे अरुण मोटघरे सायन्स काॕलेजचे अकराव्या वर्गाचा विद्यार्थी होते, तर यांचा मित्र साहिल हा शेतीचे काम करत होता. बोडीच्या बाजूला रस्त्यावर या तीन जिवलग मित्रांची सायकल व कपडे दिसल्यामुळे हे तिघे पोहायला बोडीत आले असतील असा अंदाज पोलिसांनी लावत गोताखोरांच्या मदतीने त्यांचे प्रेत बोडीतून बाहेर काढले.

संकेत हा वडीलाला एकुलता एक तर आणि साहिल हा वडिलांना बहीण भाऊ असे दोघेच होते. तर प्रणय हा शेती करून रोजगार करत होता. तीघेही जिवलग मित्र होते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.