न्यू मून शाळेत तान्हापोळा उत्साहात साजरा

न्यू मून शाळेत तान्हापोळा उत्साहात साजरापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: अर्जुनी / मोर , गावच्या न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात तान्ह्या पोळ्यानिमित्त प्रायमरी विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पोळा नुकताच भरवण्यात आला होता. या
नंदीसजावट व त्याला अनुरूप वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री सचीन मेश्राम व ज्यु .कॉलेजच्या प्राध्यापिका सौ.तारका रुखमोडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

प्राचार्य तथा प्रमुख अतिथींच्या हस्ते माता सरस्वतीला माल्यार्पण व नंदीपुजन करण्यात आले. विदयार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा , पारंपारिक चालीरितींची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व सांस्कृतिक ऐक्याची भावना वाढीस लागावी हाच या उत्सवामागचा आमचा हेतू आहे असे प्रतिपादन प्रा.सौ.तारका रुखमोडे यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणातून केले. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक प्राचार्य सचीन मेश्राम व सौ .तारका रुखमोडे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अध्यापिका त्रिवेणी थेर , लीना चचाणे , प्रतीक्षा राऊत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालाल हीना लांजेवार व आभार प्रदर्शन कुंजना बडवाईक यांनी मानले .या कार्यक्रमाला पालकांची विशेषत्वाने उपस्थिती होती .विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.अशाप्रकारे तान्ह्यापोळ्याचा आनंदोत्सवउत्साहात साजरा करण्यात करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles