मेजॉरीटीने हत्ती मारला जातो तेव्हा…!!!

मेजॉरीटीने हत्ती मारला जातो तेव्हा…!!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तीव्र बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्याच्या लेखनात आढळून येणारा इंग्लिश लेखक व पत्रकार म्हणजेच जॉर्ज ऑर्वेल.

ऑर्वेलने लेखनात कल्पनाधारित, तत्त्वनिष्ठ पत्रकारिता, साहित्यिक समीक्षा आणि काव्य असे नाना लेखनप्रकार हाताळले. त्याची नाइंटीन एटी-फोर (इ.स. १९४९ साली प्रकाशित) ही कादंबरी आणि उपहासात्मक लघुकादंबरी अ‍ॅनिमल फार्म (इ.स. १९४५ साली प्रकाशित) ह्या विख्यात साहित्यकृती आहेत. विसाव्या शतकात ह्या दोन पुस्तकांनी खपाचा उच्चांक गाठला होता. स्पॅनिश यादवी युद्धकाळात रिपब्लिकनांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांवर त्याने होमेज टू कातालुन्या (इ.स. १९३८ साली प्रकाशित) हे पुस्तक लिहिले. त्याचे राजकारण, साहित्य, भाषा आणि संस्कृती या विषयांवरील अनेक निबंधही नावाजले गेले आहेत.

आधुनिक संस्कृती, राजकारणावरचा ऑर्वेलचा पगडा अद्यापही अबाधित आहे. त्याने भाषेला बहाल केलेल्या अनेक नवीन संज्ञांबरोबरच ऑर्वेलियन ही संज्ञा शब्दकोशांत समाविष्ट झालेली आहे.

ॲनिमल फार्म हे रशियन राज्यक्रांतीवरील उपरोधप्रचुर रूपक होय. “सर्व प्राणी समान आहेत पण काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत”, यावर आधारित प्राण्यांचे रूपक वापरून उपरोधातून सटीक भाष्य या कलाकृतीत केले आहे. ऑर्वेलच्या या कादंबरीला त्याची सर्वोत्कृष्ट कलाकृती समजले जाते. तर नाइन्टीन एटीफोर मध्ये स‌र्वंकष राजसत्तेवर विदारक टीका केलेली आहे. यातील बिग ब्रदर आणि थॉट ऑफ पोलिस सारख्या संज्ञा फार प्रभावी ठरल्या.या दोन्ही कादंबर्‍यांसाठी हॉल ऑफ फेम पुरस्काराने गौरविण्यात आले.

डाउन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन (१९३३) या पॅरिस मधील वास्तव्यातील अनुभवांवर आधारित या पहिल्या पुस्तकानेच सुरूवातीला त्याला नाव मिळवून दिले. बर्मिज डेज (१९३४) या पहिल्या कादंबरीतून त्याने ब्रिटीश साम्राज्यवादावर हल्ला चढविला. बर्मा येथे असतांना आलेल्या अनुभवांवर आधारित दोन प्रकरणे या कादंबरीत प्रविष्ट आहेत. क्लर्जिमन्स डॉटर (१९३५) मधून शेतकरी आणि श्रमिकांच्या जीवनाचे वास्तववादी चित्रण केले तर कीप द ॲस्पिडिस्ट्रा फ्लाइंग (१९३६) या कादंबरीत मध्यमवर्ग आणि सरंजामी वर्ग यांचे चित्रण आहे. कमिंग अप फॉर एयर (१९३९) यातून त्याने एका मध्यमवर्गीय माणसाचे आधीच्या आणि समकालीन इंग्लंड बाबतचे स्मरणरंजन आणि भाष्य मांडले.

जेव्हा जेव्हा बहुमताने अल्पमतात असलेल्यांना नामोहरम केले जाईल तेव्हा तेव्हा मेजॉरीटीने हत्ती मारला हा डायलॉग आपण आठवणीने मारू आणि तोच जॉर्ज ऑर्वेलला खरा मान असेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles