दृष्टीदानासाठी अनंतशांती व व्हिजन स्प्रिंगचा अनोखा उपक्रम

दृष्टीदानासाठी अनंतशांती व व्हिजन स्प्रिंगचा अनोखा उपक्रमपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अवघ्या ६० रुपयात ५० हजार रुग्णांना चष्म्याचे वितरण_

सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)

कोल्हापूर: तेरा वर्षे समाज कार्याला वाहून घेतलेल्या अनंतशांती सामाजिक संस्थेच्या वतीने राधानगरी, कागल, करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, आदी तालुक्यात हाती घेतलेल्या संकल्पनुसार ५० हजार लोकांना दृष्टी दान देऊन साठ रुपयात चष्मा देण्याचा व गरजू व गरीब रुग्णांना आधार देण्याचे काम अनंतशांतीने सामाजिक संस्थेने पूर्णत्वास नेले आहे.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी अनंतशाती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था या संस्थेने अनेक ग्रामीण गरजू लोकांच्या मागणी वरुन गेल्या तीन महिन्यात व्हिजन स्पिंग फौंडेशन दिल्ली यांच्या सहकार्याने दृष्टी दान दिनाचे औचित्य साधत आज अखेर राधानगरी, कागल, करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर जिल्ह्यात पन्नास हजार हुन अधिक रुग्णांना तपासणी करून चष्मे वाटप केले आहेत.दरम्यान शिबिरात योगदान देणाऱ्या व्हिजनस्प्रिंग कंपनीला व सर्व डॉक्टर, टेक्निशियन कर्मचारी यांना मदर तेरेसा पुरस्काराने अनंतशांतीच्या वतीने गौरविण्यात आले. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची डॉ. शितल शिरसाट, गणेश चिकणे, गोपाळ पानभरे, प्रंशात भुसारी,आदी टिमच्या प्रयत्नातून पन्नास हजार हुन अधिक रुग्णांची मोफत तपासणी व अवघ्या साठ रुपयात चष्मा वाटप हा उपक्रम यशस्विरित्या पूर्ण केला आहे.

डॉ.दीपा कुष्ठे, डॉ. माधुरी खोत,डॉ. अश्विनी खराटे, डॉ.नंदिनी गावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण व गरजू लोकांसाठी ही शिबिरे आयोजित केली होती संस्थेच्या वतीने लवकरच धर्मादाय हॉस्पिटल चालू करण्याचा मानस असून व संस्थेला लोकवर्गनीतून दोन ॲम्बुलन्स सुद्धा मिळणार आहेत. या ॲम्बुलन्स मार्फत देखील आरोग्य सेवा जोपासली जाणार आहे.

या शिबिरात सुतगिरणी कामगारापासून सुरु झालेल्या या प्रकल्पाचा डोगंराळ दुर्गमवाडी वाडीवस्तीतील लोकांपर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी अनंतशातीचे संस्थापक भगवान गुरव अध्यक्षा माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील, राधानगरी भुदरगड अध्यक्ष सुभाष चौगले, संचालक जे. के. गोरंबेकर, रसुल शेख, सागर लोहार, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles