आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर नराधमाचा बलात्कार

आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर नराधमाचा बलात्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर घराशेजारी राहणाऱ्या युवकाने बळजबरी लैंगिक अत्याचार केला. ही घटना नरखेड तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. अनिल सुरेश टेकाडे (३२) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल टेकाडे याला मद्याचे व्यसन आहे. त्याची वाईट नजर शेजारी राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर होती. तो नेहमी त्या मुलीशी छेडखानी करीत होती. ती घरी आल्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. अनेकदा पीडितेच्या घरी कुणी नसताना तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता शेजारी असलेल्या एका इमारतीच्या मागे नेऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. केलेल्या कृत्याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली.त्यानंतर तो वारंवार पीडितेवर अत्याचार करत होता. १३ सप्टेंबरला सायंकाळी अनिल टेकाडे हा त्या पीडितेवर अत्याचार करताना गावातील एका युवकाला दिसला. त्याने पीडितेच्या आईवडिलांना सांगितले. पीडितेच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिलला अटक केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles