
नागपुरात उड्डाणपुलावर चारचाकी गाडीने बाईकस्वारास उडवले, महिलेचा पुलाखाली पडून मृत्यू
नागपूर: शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावरून भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
चार चाकी गाडीने मागून दुचाकीला टक्कर दिल्याने दुचाकी वर जात असलेल्या पती-पत्नींपैकी महिला उडान पुलाच्या खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतक महिला तिच्या पती सोबत पुलावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव बलेनो कारने त्यांचा दुचाकीला जोरदार धकड दिली,
ज्यामध्ये महिला पुलावरून खाली कोसळली ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. चार चाकी गाडीचा चालक आणि गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.