गोंदियात रेकॉर्ड ब्रेक पाऊस

गोंदियात रेकॉर्ड ब्रेक पाऊस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पुरात वाहून गेलेला इसम अद्यापही बेपत्ताच_

तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यातील पावसाचा विक्रम 132 मी मी काल नोंदला गेला.अतिवृष्टीमुळे गोंदियात ठिक ठिकाणी पाणी साचले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे अनेक वस्त्यामध्ये पाणी साचल्याने बऱ्याच शाळांनाही बुधवारी सुट्टी देण्यात आली. मुख्य रस्ताही पाण्याच्या प्रवाह कचाट्यातून सुटलेला नाही.

पहाटेच्या सुमारास न्यू लक्ष्मी नगर लोहिया वार्डातील रणजितसिंग गिल हा 21 वर्षाचा युवक पुराच्या पाण्याच्या प्रवाहात मोटरसायकलसह वाहून गेल्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरलेली आहे. अद्यापही तो बेपत्ताच आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग शोध पथकाने त्याचा शोध घेण्यासाठी सकाळ पासूनच शोधमोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुजारीटोला धरणाचे 13 दरवाजे व शिरपूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून अजूनही विसर्ग जोरदार सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे अजूनही जिल्ह्यात पावसाचा जोर सुरूच आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles