नागपुरात क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देहव्यवसायासाठी आलेल्या दोन रशीयन तरूणींना अटक

नागपुरात क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देहव्यवसायासाठी आलेल्या दोन रशीयन तरूणींना अटक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर:आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर रशियातून नागपुरात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या दोन रशियन तरुणींना सदरमधील एका इंटरनॅशनल दर्जाच्या हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही तरुणी नागपुरात देहव्यवसायासाठी आल्या होत्या, अशी माहिती आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या शुक्रवारी नागपुरात भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्यात येणार आहे. त्यामुळे नागपुरात विदेशातील क्रिकेटप्रेमींची गर्दी वाढणार आहे. अनेक विदेशी पाहुणे नागपुरातील नामांकित हॉटेलमध्ये थांबतात. ही बाब लक्षात घेऊन रशियन-युक्रेन या देशातील दोन तरुणी देहव्यापार करण्यासाठी नागपुरात आल्या होत्या. दोन्ही तरुणी नागपुरातील एका सेक्स रॅकेटशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यांचा व्हिसा दलालाने जप्त केल्याची माहिती आहे. यापूर्वीही नागपुरात रशियन तरूणी देहव्यापार करण्यासाठी आल्या असताना त्यांना पोलिसांनी अटक केली होती, हे विशेष.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles