Home गावगप्पा न्यू मून विद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न

न्यू मून विद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्न

299

न्यू मून विद्यालयात शिक्षक पालक सभा उत्साहात संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

गोंदिया: जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका येथील न्यू मून इंग्लिश मिडियम विद्यालयात शिक्षक पालक सभेचे आयोजन आज दि.23/09/22 ला करण्यात आले. या सभेला पालकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. सभेत शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. या शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री सचिन मेश्राम व उपाध्यक्ष म्हणून पालकांमधून सौ.मेघा धनविजय यांची तर सचिव सौ.लीना चचाणे सहसचिव म्हणून त्रिशीला बडोले या माता पालकांची निवड करण्यात आली.सात सदस्यांची कार्यकारिणी तयार करण्यात आली.

याप्रसंगी पाल्यांच्या अभ्यासातील अडचणींवर चर्चा करण्यात आली व त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. पालकांनी तर या शाळेत आपल्या पाल्याला सर्व सुविधा व उत्तम शिक्षण मिळत असल्याचे व आपल्या पाल्याची उत्तरोत्तर प्रगती शिक्षकांच्या परिश्रमामुळे होत असल्याचे समाधान व्यक्त केले. कोरोना काळामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर जो ताण आला होता तो ताण या शाळेत येऊन पूर्णतः नष्ट झाला व मुले या शाळेतील वातावरणामुळे पूर्णतः क्रियाशील बनली असेही मत माता पालकांनी मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन मेश्राम सर यांनी विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास व्हावा यासाठी शाळा तत्पर असेल अशी ग्वाही दिली. तर प्राध्यापक उंदीरवाडे व प्राध्यापिका सौ. तारका रुखमोडे यांनी पालकांच्या मनात आपल्या पाल्याप्रती असणाऱ्या सर्व शैक्षणिक समस्यांचे चर्चेतून निराकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिवेणी थेर यांनी केले व प्रास्ताविक प्रतीक्षा राऊत यांनी केले. आभार श्री बांडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी हिना लांजेवार, कुंजना बडवाईक, शिला बोरीकर व समस्त शिक्षकांनी परिश्रम घेतले. अशाप्रकारे पालक शिक्षक सभा अतिशय उत्साहात पार पडली.