ज्ञानदानास समर्पित शिक्षकांचा गौरव

ज्ञानदानास समर्पित शिक्षकांचा गौरव



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

नाशिक – येथील ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कारांचे वितरण नुकतेच समारंभपूर्वक करण्यात आले असून या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष वसंत पाटील होते. कर सल्लागार प्रकाश पाळदे, अ‍ॅड. समीर जोशी, भगवती लॉन्सचे संचालक राजेंद्र गायकवाड, संस्थेचे सल्लागार सुहास कुलकर्णी, अक्षय फाऊंडेशनच्या अध्यक्षा मोना दीदी, एन. एफ. बी. इंडियाचे सचिव जगदीप कवाळ, चिंतामण आहिरे, बुद्धिस्ट असोसिएशनचे खजिनदार संजय घोडेराव या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गितेश बुऱ्हाडे यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात संस्थेची माहिती व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी करुन दिला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ. हेलन केलर, लुई ब्रेल यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेल्या ३६ शिक्षकांना प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, विचारपुष्प व गुलाबपुष्प देऊन सर्व शिक्षकांचा गौरव करण्यात आले. गणंजय काहाळेकर (नांदेड), राजेंद्र जाधव (रत्नागिरी) राजश्री जाधव व रियाज तांबोळी (सोलापूर) यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सत्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसुधा जोशी आणि प्रा.अमोल अहिरे यांनी केले. प्रदीप जगताप यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles