शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात

शिंदे गटाचे ५० आमदार भाजपाच्या संपर्कात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: राज्यात काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. या सत्तांतरावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तब्बल 50 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. नंतर एकनाथ शिंदे आणि बाकी 50 आमदारांनी भाजपचा (BJP) हात धरत नवं सरकारही स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अशातच ठाकरे गटाने एक दावा केला आहे. शिंदे गटातील 22 आमदार हे नाराज आहेत. हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांना भाजपमध्ये विलीन करून घेतील, असं ठाकरे गटाकडून म्हणण्यात आलंय. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या या दाव्याला मंत्री दिपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिंदे गटाचे 22 नव्हे तर 50 आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. आमची भाजपसोबत चांगली मैत्री आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्याची काळजी करू नये, अशी खोचक टीकाही केसरकर यांनी केली.येत्या काळात आणखी किती आमदार आपला पक्ष बदलणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ठाकरे गटाने केलेला दावाही खरा की खोटा हे येता काळच ठरवेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles