‘आभारीय पुष्पफुले’; कवयित्री सुनिता आंबेकर

‘आभारीय पुष्षफुले’; कवयित्री सुनिता आंबेकर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“कविता,चारोळयांची बरसात
मराठीचे शिलेदार समुहात,
रचनांचा इथे सुरेख संगम
वाचुनी अंतर होई हर्षित..”

आज मला खूपच आनंद होत आहे. आज मी अभिमानाने आणि गर्वाने सांगू शकते, की माझ्या आयुष्याला समुहात नवीन कलाटणी मिळाली आहे. आपली आवड, आपला छंद जोपासण्याची मला इथे सुवर्णसंधी मिळाली. आता तर असे वाटते, की कल्पनेचे पंख लावून लेखणीच्या माध्यमातून उंच आकाशाला गवसणी घालावी. शब्दांनी, विचारांनी मुक्त संचार करावा.खरंच हा आत्मविश्वास मिळाला तो या समुहात.

आज मी खूप भारावून गेले आहे किती बोलू अन् किती लिहू असे झाले आहे. खरोखर ज्या भावना माझ्या दबलेल्या होत्या; त्या व्यक्त करण्यास मला हे खूप सुंदर व्यासपीठ मिळाले. सुरवंटाचे जणू फुलपाखरू होत आहे. अजूनही मला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मराठीचे शिलेदार समुहाचे प्रशासक सन्माननीय राहुल दादा यांनी हे व्यासपीठ नव कवी अन् कवियत्रींना खुले करून दिलेले आहे. त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम.

मुख्य परीक्षक आदरणीय सौ. सविता ताई ठाकरे ह्या कोणतीही अडचण आली की न कंटाळता, हसतमुखाने ती अडचण सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात. तसेच मोलाचे मार्गदर्शन करणारे, सतत स्नेहाने प्रोत्साहित करणारे, आपल्या अनुभवांची शिदोरी आमच्यासाठी मुक्तपणे उधळणारे सर्व संचालक गण, परीक्षक गण, वैशालीताई, अरविंद दादा, विष्णू दादा, संग्राम दादा, हंसराज दादा,सुधाताई , तारका ताई,स्वातीताई या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच मराठीचे शिलेदार समूहाचे पण आभार. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यावर अशाच राहोत जेणेकरून माझी लेखणी अशीच बहरत जाईल. भावनेच्या भरात काही चुकले असल्यास क्षमस्व… पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देते.

सौ. सुनिता लकीर आंबेकर खानवेल
दादरा नगर हवेली
©️सदस्या मराठीचे शिलेदार समुह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles