‘अल्पसं ….पण मनातलं..!’; केवलचंद शहारे

‘अल्पसं ….पण मनातलं..!’; केवलचंद शहारे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सर्वप्रथम आ. राहुल दादांना मानाचा मुजरा. दादा तुमचं अगाध व्यक्तिमत्त्व व्यासपीठावरील धावपळीवरून कळलं. तुमची धावपळ ही एखाद्या चित्यासारखी होती. म्हणजे कामात सदैव व्यस्त दिसून येत होतात. पुन्हा स्टेजवर किती हलकाईने सारं बघत होतात. तुम्ही चमत्कारीक आहात दादा. आपलं कौतुक करावं तेवढं कमीच.

🚩लातुरातील हा सोहळा खरंच विस्मयकारी, अनोखा असाच होता. सर्व साहित्य प्रभू एकमेकांना फुलपाखराप्रमाणे भेटत होते. ऐकमेकांना भेटून भावना व्यक्त करायचे. मन हलकं करायचे आणि असे अनेक प्रसंग भावनावश करणारेच होते. दादा सर्वांना भेटून, त्यांच्याशी प्रेमाने बोलून, समस्या ऐकून त्यांचे समाधान करायचे. तुमच्या बोलण्यात साखरेसारखा गोडवा दिसून येत होता. आपल्या उदारतेचे प्रसंग मनाला हेलावून टाकणारे होते. हे सगळं डोळ्यांनी बघत होतो. भाव-भावनांचा खेळ चालू होता, तेव्हा आपसूकच डोळे पाणावले.

❤️खरं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हा कुठे असेल तर ह्या शिलेदारांच्या परिवारातच मिळतो. या समूहातील मुख्य प्रशासक, सहप्रशासक मुख्य परीक्षक वैशालीताई ,सविताताई, स्वातीताई, पल्लवीताई, हंसराजदादा , अरविंददादा, अशोकदादा इत्यादि समूहातील गणमान्य साहित्य प्रभू प्रेमळ मूर्ती आहेत. त्यांच्या हृदयातून सतत ओलावा, प्रेमाचा झरा हा ओसंडून वाहत असतो. यांच्याच कर्तृत्वाने हे सगळं घडत असते.या समूहाची धुरा या सगळ्यांवर अवलंबून आहे. या सर्व गोष्टी याच समूहात बघायला मिळतात… सर्वेसर्वा प्रशासक दादा यांचे अतुल्य मार्गदर्शन आणि अतुलनीय योगदान अनमोलच.

🚩एकंदरीत लातूर नगरीतील हा अद्वितीय सोहळा अनोखा, देखणा, लाजबाब,सुंदर, विस्मयकारी, मनाला भावणारा होता. हीच दादांच्या कर्तृत्वाची पावती होय. त्यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा…

🙏असंच या समूहात मला प्रेम, माया , जिव्हाळा मिळत राहो हीच अपेक्षा बाळगून मी आपल्या अल्पशा मनोगताला विराम देतो. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद…जय माय मराठी ! जय महाराष्ट्र !

श्री केवलचंद शहारे
सौदड,जि. गोंदिया
सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles