मराठी साहित्यप्रेमींच्या सहवासातील अद्वितीय अनुभूती; नितेश क्षीरसागर

मराठी साहित्यप्रेमींच्या सहवासातील अद्वितीय अनुभूती; नितेश क्षीरसागर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मी तसा नवखाच या प्रांतात. म्हणून आपणा सर्व मराठीच्या शिलेदारांचे आभार मानायला उशीर झाला. करिता दिलगीरी व्यक्त करतो. खरे तर मी आपणापेक्षा लहानच. परंतु आपण दिलेला मान व केलेला सन्मान ही माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. कारण मराठी माणसांनी एका मराठी माणसांचा केलेला आदर सन्मान हा माझ्यासाठी पुरस्कारापेक्षा मोठा आहे. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, संपादक व संस्थापक राहुल पाटील यांनी यंदाचा ‘साहित्यगंध’ पुरस्कार देऊन माझा यथोचित गौरव केल्याबद्दल राहुल दादांचे मन:पूर्वक आभार मानतो. मराठी साहित्यप्रेमींच्या सहवासातील अद्वितीय अनुभूती मला लाभली मी माझे भाग्य समजतो.

लातूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रकाशन समारंभ व कवी संमेलनाच्या अध्यक्षा सविता पाटील ठाकरे, प्रदेशाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड, सिलवासा तसेच शर्मिलाताई देशमुख, प्रशांत ठाकरे सर, वैशालीताई अंड्रस्कर व मला या समूहाच्या मुख्य प्रवाहात आणणा-या आमच्या अर्जुनी मोरगाव जि गोंदिया येथील प्रा. तारकाताई रूखमोडे यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या शिलेदार कुटुंबाचा मी एक लहानसा भाग आहे. आपण मला यापुढेही आपल्या सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो. माझे काही चुकले असल्यास मला आपण क्षमा करावी.

नितेश क्षीरसागर
आनंद डेअरी, अर्जुनी मोरगाव जि गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles