संविधान दिन व क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती साजरी
नागपूर: दि.20 नोव्हेंबर रोजी रविवारी झालेल्या कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक काटोल येथे विदर्भ. रा.आ.समिती व बहुजन मुक्ती. रा.संघटन व काटोल जिल्हा. कृ. समितीच्या संयुक्त विद्दमाने भारतीय संविधान दिन व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या झालेल्या जयंती निमित्त बुद्ध भीम गीताचा व संविधान रॅली पंचशील बुद्ध विहार रेल्वे स्टेशन ते आंबेडकर चौक पर्यत काढण्यात आली.
दुपारी 2 वाजता संविधान वाचन. वक्त्याचे प्रबोधनपर मार्गदर्शन व भीमगीत. आदिवासी नृत्य झाले रात्री 8 वाजता बुद्धभीमगीताचा मुकाबला झाला तर तो रात्री 11 प्रर्यत चालला.
कार्यक्रमाचे उदघाट्न वि.रा.आ.समितीचे जिल्हा महासचिव प्रदीप उबाळे पाटील याचे हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशभाऊ डोंगरे. राष्ट्रीय प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर व क्रांती मीनल सांस्कृतीक कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त, प्रा.वीरेंद्र इंगळे, सुभाष नोरोलिया, बाबाराव वाघमारे, गणेश वरठी, उत्तम हनवते, दिलीप सुतोने, विनू वर्मा, शामबाबू महानन्दे, कृष्णाजी डफरे, रमेश पांडे, श्रीकांत बन्सोड, भाऊराव लोखंडे, अनिल दुर्गे, हिराबाई चक्रपानी, प्रविणा खोब्रागडे, राजूभाऊ बांगर, भगवान बांगर, योगेश मोढे, मीराबाई डोंगरे, आशाताई मेंढे, प्रेम सोमकुवर, लता जाधव, पुखराज रेवतकर मोठया संख्येनी लोकांची उपस्थिती होती.