प्रसिद्ध कवयित्री प्रतिमा नंदेश्वर यांचा साहित्यगंध पुरस्काराने गौरव
चंद्रपूर/मूल: जि. प. उच्च प्राथमिक शाळा चिमढा येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध कवयित्री व शिक्षिका प्रतिमा प्रकाश नंदेश्वर यांचा आज दि.२२/११/२०२२ रोजी मराठीचे शिलेदार समूहातर्फे यंदा जाहीर झालेला मराठी साहित्यक्षेत्रातील मानाचा ‘साहित्यगंध’ पुरस्कार जि प उच्च प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका विषय शिक्षिका सौ.विणा रांगणकर यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी विषय शिक्षक नरेंद्र चुदरी सर,श्री धर्मपाल बोदलकर सर, कु.सुवर्णा कुळमेथे म्याडम, कु.कविता कोडापे म्याडम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.