जि.प.उच्च प्रा.शा सायगव्हाण येथे ‘संविधान दिवस’ उत्साहात

जि.प.उच्च प्रा.शा सायगव्हाण येथे ‘संविधान दिवस’ उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_विद्यार्थ्यांनी केले संविधान उद्देशिकाचे सार्वजनिक वाचन_

वर्धा: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सायगव्हाण ता. समुद्रपूर जि. वर्धा येथील शाळेच्या प्रांगणात आज दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘संविधान दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील वर्ग १ ते ७ च्या विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकाचे सार्वजनिक वाचन करून संविधान निर्माते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.

जि.प.उच्च प्रा.शा सायगव्हाण येथे आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अमोल उईके, अंगणवाडी सेविका चित्रा सोनवणे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक पाटील आर. जी. व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सहशिक्षक मेहेत्री आर बी यांनी संविधान दिनाबद्दल विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. संविधान पाठांतर असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले, मुख्याध्यापक पाटील सर यांनी आजच्या दिवशी संकल्प करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अमोल उईके यांनीही आपले मनोगत मांडले.

याप्रसंगी जि.प.उच्च प्रा.शा सायगव्हाण येथील प्रांगणात माजी विद्यार्थी वैभव मसराम, ऋतिक अडकीने, वृषाली सोनवणे, आकाश आसोटकर, अभिषेक उईके, आशीष खिरटकर व स्वयपांकी मदतनीस सविता सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles