
जगावेगळी अनुभूती देणारा हा खेळ; प्रा. तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण_
निसर्गाविष्काराचा अद्भुत नजारा.. सुंदर अनुभूतीच्या सुखामृत धारा..तनूस स्पर्शणारा हा मारुतराणा…मनचक्षूंना सुखावणारा..हा सुंदर सागरी किनारा…
मनास खुणावे सागरी क्रिडेचा बाणा
खरंच माणूस शहरी गर्दीत यंत्रवत कामात असतो.या रगाड्यात त्याला विरंगुळा व एकाकीपणा संपवणारं समाधान हवं असतं..व शारीरिक स्वास्थ्य व मानसिकता प्रबळ करण्यसाठी वेगवेगळे खेळ प्रयोग करतो पण तरीही आनंद अनुभूती साठी त्याचं मन काहीतरी नावीन्याच्या शोधात असतो.
साहसी खेळ
सिंधू नभ विहार
हर्ष बहार
आकाशाची विशालता व समुद्राची अथांगता त्याला नेहमीच खुणावत असते म्हणूनच मन आपसूकच त्या अफाट समुद्रावरील सागरी किनाऱ्याकडे वळते. कित्येक गूढ, सत्य, गहनता त्याच्या अंतरंगात दडलेली म्हणूनच हयाच जिज्ञासेपोटी व अत्युच्च साहसी चित्तथरारक आनंद अनुभूतीसाठी सागरी विविध क्रीडाप्रकार केले जातात ..त्यातलाच एक चित्त थरारक क्रीडाप्रकार म्हणजे पॅरासेलींग …
..पॅरासेलिंग हा चित्त थरारक साहसी समुद्री खेळ..पण तरीही मनाला एक अविस्मरणीय रोमांच देणारा.. सागरी लाटांवरून हवेच्या आगाजाशी खेळत छत्रीसमवेत नभात झेपावताना, आनंदाच्या दाही दिशा खुलायला लागतात..निळ्याशार पाण्याचा.. नजरेत न मावणारा विशाल सागर, वर रभ्राची अनंत पोकळी..यात जेव्हा आपण सर्व अडथळे सारून दिव्य सुखात तरंगतो, तेव्हा सत्य, शिव,सुंदरतेची अनुभूती होते ..
मनावरील मळभ,ताण विसरून प्रकृतीच्या या महान जादुगीरीपुढे मनातील अहंकार गळून पडतो
खरंच नं… आकाशाची विशालता व समुद्राची अथांगता नसती तर मला वाटतं माणसाला भव्य दिव्य करावं व त्यातून आनंद लुटावा अशी प्रेरणा कधी मिळाली नसती.. म्हणून प्रत्येक गोष्टीतील आनंद आपल्याला टिपता,घेता आला पाहिजे. जगण्यातील आनंदच आपल्याला मनमुराद आनंद देतो,चाकोरीबद्ध आयुष्य सगळेच जगतात,पण अशी साहसी वाट व साहस स्वीकारणारे मोजकेच असतात. सामान्यापेक्षा विलक्षण वेगळे आपण करतोय याचे फार मोठे समाधान दर्यायी खेळ मनाला मिळवून देतात.जगावेगळी अनुभूती देणारा हा खेळ क्वचित धोकादायकही ..पण मरण तर रोजचेच घरीही आहे ..मग घरी कुढण्यापेक्षा स्वच्छ॔दी विहार
करायचा..उंच नभी सागरावरी…
कोणाला भीती वाटत असेलही पण कविमनाला ना उंचीची भीती ना सागरात डुंबण्याची.. हे मर्म ओळखूनच आमच्या आ.राहुल सरांनी कवींना उंच शब्दभरारी घेण्यासाठी कदाचित हे चित्र दिलेलं…आमचे शिलेदार कविवर्यही कोणी मुक्त मनाने झोका घेतला, तर कोणी रोमांचित अंगाने अंबरी सोबतीने भरारी घेतली, कुणी वाऱ्याशी साद घातली पण मातीशी नाते जपले,एकंदरीत सर्वांनाच ही सागरी खेळाची न्यारी दुनिया भावली..सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन .अशेच लिहिते व्हा ..💐💐
आ.राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल हृदयस्त ॠणाभार .🙏🙏
प्रा तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव जि गोंदिया
परीक्षक, संकलक, सहप्रशासक, कवयित्री