जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, क्र १ कन्नड येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन
कन्नड: सत्यशोधक व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची पुण्यतिथी आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नं.1 मध्ये शिक्षणाधिकारी शेषराव गंडे साहेब व क्षेत्रिय अधिकारी दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व शास्त्रज्ञ जॉन वेस्ले हयात यांची जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस सतीश कोळी यांनी पुष्पहार अर्पण करून फुले यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ जॉन वेस्ले हयात यांची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
यावेळी सतीश कोळी यांच्याकडून शाळेला 10 बडबडगीतांचे पुस्तके भेट देण्यात आले. कार्यक्रमास कन्नड नंबर एकच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना सूर्यवंशी, सबा अन्सारी,कल्याण राऊत,कन्नड नंबर 3 च्या अर्चना पाटील, सुवर्णा गायके, माता पालक सदस्य मोनिका शेजवळ आदी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर भाषण करून त्यांची माहिती सांगितली.