विदर्भावरील अन्यायाच्या विरोधात व्हेरायटी चौकात उद्या निदर्शने
_’सबका साथ सबका विकास विदर्भ मात्र एकदम भकास’_
नागपूर: विदर्भावरील अन्यायाचा निषेध करण्यासाठी उद्या 10 डिसेंबरला जागतिक मानवाधिकार दिनाचे निमित्त साधून लोकनायक बापूजी अणे स्मारक समिती तर्फे निदर्शने केली जाणार आहेत.
व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्याजवळ उद्या सकाळी 10 ते 12 याकाळात होणाऱ्या या निदर्शनात सर्व विदर्भवादी संघटना आणि जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे सचिव अॅड. अविनाश काळे यांनी केले आहे.
देशाचे पंतप्रधान सबका साथ सबका विकास म्हणत असताना विदर्भात मात्र एकदम भकास स्थिती आहे, असा आरोप करून काळे म्हणाले- महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे विदर्भाचा विकास ठप्प झाला आहे. दहा लाख हेक्टर जमिनीला सिंचन नाही. वैनगंगा-नळगंगा प्रकल्प धूळ खात पडला आहे. म्हणूनच पाच लाख कोटी अनुशेषासह वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.