तालुकास्तरीय गायन स्पर्धेत अर्णव अलोणेचे सुयश
वैशाली अंड्रस्कर, प्रतिनिधी
चंद्रपूर : दिव्यांग जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत चंद्रपूर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट मराठी प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी अर्णव हरीचंद्र अलोणे ह्याने गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे.
या यशाबद्दल पंचायत समिती चंद्रपूर चे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आणि गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे यांनी प्रमाणपत्र देऊन कौतुक केले. या कार्यक्रमाला
पंचायत समितीतील मान्यवर अधिकारी आणि शिक्षक पालक उपस्थित होते.