कलाभान जपणारं “आत्मभान” चित्रप्रदर्शन

कलाभान जपणारं “आत्मभान” चित्रप्रदर्शन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_अनुवादक उमा कुलकर्णींचा अनोखा कलारंग_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: मानवी भावनांचे आणि विचार तरंगाचे विविध रंग टिपणारे आणि स्वतःचा शोध घेता घेता “आत्मभान ” देणारे सुदर्शन कलादालनातील एक अनोखे चित्रप्रदर्शन सध्या शहरात चर्चेचा विषय झाले आहे. प्रसिध्द अनुवादक आणि लेखिका उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांच्या कुंचल्यातून उतरलेला हा अनोखा कलारंग रसिकांना विस्मयचकीत करणारा आहे.

आजपर्यंत ज्यांच्या लेखनाने आणि अनुवादाने वाचक मंत्रमुग्ध झाले; त्याच उमाताईंच्या कुंचल्यातून एकापेक्षा एक अमूर्त शैलीतल्या विलोभनीय रंगछटांनी सजलेले कॅनव्हास रसिकांना मोहवून ठेवत आहेत. अभिजात कलेचा विलक्षण अविष्कार असलेली ही चित्र साधारण 2016 पासून चित्रबध्द करण्यात आलेली असून ‘आत्मभान’ प्रदर्शनात प्रामुख्याने याच चित्रांचा समावेश करण्यात आला असल्याचे उमाताईंनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. त्या पुढे बोलताना म्हणाल्या,” खरे तर मी 2008 पासून खरी रंगरेषांच्या या क्षेत्रात आले.

सुरवातीला मुळात मला आधी फोटोग्राफीचा छंद होता. त्यातूनच चित्रचौकटींचे आकर्षण वाढले. आणि त्यात रंगांची दुनिया कुंचल्यातून साकारण्याचे वेड जडले. माझी आई फार रेखीव रांगोळ्या काढायची आणि त्यात सुरेख रंग भरायची. तिथूनच मला हे आकर्षण निर्माण झाले. पण नुसता छंद म्हणून एखादी कला पुर्णत्वाला जात नाही, म्हणून या कलेतले प्रत्यक्ष ज्ञान आणि तंत्र शिकून घेणे आवश्यक वाटले. त्यासाठी एस. एन. डी. टी. महाविद्यालयात चित्रकलेत एम. ए. ची मास्टर डिग्री पूर्ण केली. प्रसिध्द शैलीदार चित्रकार भैय्यासाहेब ओमकार आणि मुकुंद केळकर असे दिग्गज कलावंत गुरू म्हणून लाभले आणि माझ्यातली चित्रकला ख-या अर्थाने स्वतःचे रंग घेऊन कॅनव्हासवर उतरू लागली.

या चित्रकलेने मला अतिशय आनंद दिला आहे. जसा मूड असेल तशी चित्र उतरत जातात. मनाची प्रसन्नता किंवा उदासलेपण चित्रात जसंच्या तसं प्रतीत होतं. या प्रदर्शनाच्या निमित्ताने जवळजवळ 35 चित्र एका जागी बघताना रसिकांना याचा प्रत्यय येईल, ”
ऑक्रोलिक रंगातलं हे चित्रकाम सुंदर रंगछटांनी नजरेला भूरळ घालणारं आहे. अमूर्त शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे, रसिकांच्या मनात ज्या प्रतिमा घट्ट बसलेल्या असतात, त्याचेच मूर्त रूप त्यांना चित्रात दिसते.
या प्रदर्शनाचे उदघाटन दि. 10 डिसेंबर रोजी झाले. या प्रसंगी संपादक, वंदना बोकील कुलकर्णी आणि चित्रकार, निखिल पुरोहीत यांनी उमाताईंची कला व साहित्य या विषयावर प्रकट मुलाखत घेतली. दि.17 डिसेंबर पर्यंत ते रसिकांसाठी रोज संध्याकाळी सुदर्शन कलादालनात 4 ते 6 या वेळात खुले आहे. प्रदर्शनासोबत ही चित्रे विक्रीसाठीही उपलब्ध असून रू. 1000 पासून रू. 20,000 पर्यंत किंमतीची ही चित्रे खरेदी करण्याची रसिकांना संधी आहे. विविध क्षेत्रातील रसिक मान्यवर प्रदर्शनाला रोज भेट देत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles