निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कर्मचा-यांना सुट्टी जाहीर करावी

निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी कर्मचा-यांना सुट्टी जाहीर करावी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महा.राज्य प्राथ.शिक्षक समितीचे सीईओंना निवेदन-

औरंगाबाद: दि.१८ डिसेंबर, २०२२ रोजी राज्यातील सुमारे ७६८२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत. शासनाने
दि १५ डिसेंबर, २०२२. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे क्रमांक रानिआ/ग्रापनि २०२२/प्र.क्र.८/का-८, दि. १४ डिसेंबर, २०२२ रोजीचे पत्र.वरील
संदर्भाने निर्गत केले आहे.

आयोगाने संदर्भाधीन पत्रान्वये निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दि. १८/१२/२०२२ रोजी परिशिष्ट-१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूकीत बरेच कर्मचारी हे सलग दोन दिवस निवडणुकीच्या कामात व्यस्त असणार आहेत, करीता त्या निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या दुसऱ्या दिवशी एका दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी,अशी मागणी शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात दिनांक १८.१२.२२ रोजी मोठया प्रमाणात ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. या निवडणूच्या कामासाठी मोठया प्रमाणात शिक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रीया पार पाडल्यानंतर मतदान साहित्य मतदान संकलन केंद्रावर परत सादर करण्यासाठी रात्री उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात नमुद केले आहे.निवेदनदेतेवेळी जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय साळकर, रंजित राठोड,नितीन नवले,शाम राजपूत, शालिकराम खिस्ते, विष्णू भंडारी, किसन जंगले,सतीश कोळी,कडूबा साळवे,कालिदास रणवरे,पाशु शहा,बबन चव्हाण,विलास चव्हाण, गणेश अवचार,अंकुश वाहूळ,अंकुश इथर, सिकंदर घोडके,दीपिका एरंडे,अर्चना गोर्डे,प्रीती जाधव,शेख फातिमा बाजी,अशोक चव्हाण, योगेश मुंडलिक,अशोक डोळस,के.डी.मगर,कैलास ढेपले,दत्ता खाडे,प्रकाश जायभाये,पंकज सोनवणे,पंजाबराव देशमुख,यादी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles