संध्यासमयी नागपुरात बरसल्या पावसाच्या सरी

संध्यासमयी नागपुरात बरसल्या पावसाच्या सरीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कामावरून परतलेल्या चाकरमान्यांना अचानक बरसलेल्या पावसाच्या सरी अंगावर झेलत घर गाठावे लागले. तर काही नागपूरकर जिथे निवारा भेटेल थांबलेले आहे. छत्रपती चौक येथे गोल्हर हाऊस या टॉवरवर वीज पडल्याने अनेक नागरीक भेटेल त्या वाटेने पळत सुटल्याचे निदर्शनास आले.

अचानक बरसलेल्या पावसाच्या सरीने नागपूरकरांना उकाड्याचा दिलासा दिला असली तरी, थंडीचा हंगाम संपला नसतांना हा अवकाळी पाऊस नागपूरकरांच्या आरोग्यास धोकादायक असल्याचे प्रत्यदर्शींनी सांगितले.

आज अचानकपणे साधारण स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूर शहराच्या काही भागात हा पाऊस कोसळला तर काही भागात मात्र पावसाने दडी मारली. अचानकपणे आलेल्या या अवकाळी पावसाने रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसापासून नागपुरात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात वाढ झाली होती. मात्र आज आकाशातून ढगांची गर्दी कमी झाली आणि काहीसा निरभ्र वातावरण झाल्यानंतर मात्र अचानकपणे पावसाने हजेरी लावली आणि नागपूरचं वातावरण पुन्हा एकदा थंड झालं

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles